शेतकरी विरोधी कायदा त्वरित रद्द करण्याची पंतप्रधानांकडे मागणी भारत बंद ला खान्देश हित संग्रामचा पाठींबा
कल्याण, कुणाल म्हात्रे : केंद्र सरकारने केलेला शेतकरी विरोधी कायदा त्वरित रद्द करावा, शेतीमालास हमीभाव जाहीर करावा अशी मागणी खान्देश हित संग्राम या संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली असून याबाबतचे निवेदन कल्याणच्या तहसीलदारांकडे देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रेम पाटील, जिल्हा उपाध्यक्ष योगेश माळी, जिल्हा सरचिटणीस श्याम आवारे उपस्थित होते.
केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरी विरोधी आहे म्हणून शेतकरी विरोधी कायदा या देशात केला आहे. मोदी सरकार फक्त 'व्यापारी' धार्जिणे निर्णय घेत असून कृषिप्रधान देशांमध्ये शेतकरी विरोधी कायदा करून या देशातील शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचे काम सरकार करत आहे. हे तात्काळ थांबवून शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा. या देशातील शेतकऱ्याला चांगले दिवस येतील, शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल असेल त्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी मोदींना या देशाची सत्ता दिली परंतु आपण या सत्तेचा दुरुपयोग करून शेतकरी विरोधी कायदे करून शेतकऱ्याला अडचणीत आणून त्याला संपवणारे कायदे बनवत आहे. याचा खान्देश हित संग्राम कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्यावतीने आम्ही जाहीर निषेध करत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
केंद्र सरकार 'अदानी- अंबानीच्या' घशात भारताला घालण्यासाठी प्रत्येक गोष्टीचं खाजगीकरण करत आहेत. त्यामुळे सरकार वरील विश्वास सर्वसामान्य जनतेला राहिलेला नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि त्यांच्या मुलांना उध्वस्त करण्याचा मोदी सरकारचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे. त्या विरोधात भारत देशातील सर्व नागरिकांनी आता पेटून उठले पाहिजे. त्या विरोधात दिल्लीचे तक्त हलवण्यासाठी पंजाब व हरियाणा राज्यातील शेतकरी दिल्लीत सात दिवसापासून आंदोलन करत असून दोन शेतकऱ्यांनी स्वतःचा जीव दिला आहे. त्यामुळे सरकार हदरले आहे. या आंदोलनास व ८ डिसेंबर रोजीच्या शेतकऱ्यांच्या 'भारत बंद' ला खान्देश हित संग्राम कल्याण डोंबिवली जिल्ह्याचा सुद्धा 'जाहीर पाठिंबा' असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे.

Post a Comment