Header AD

भिवंडीत पिण्याच्या पाण्यासाठी अजमेर नगर मधील महिला उतरल्या रस्त्यावर

भिवंडी  , प्रतिनिधी   :  भिवंडी शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असल्याने नागरिकांसह महिला वर्गामध्ये मनपा प्रशासनाविरोधात प्रचंड नाराजी पसरली असून गुरुवारी शहरतील अजमेर नगर परिसरातील महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी परिसरात हंडा मोर्चा काढून आपला राग व्यक्त केला. 


अजमेर नगर भागात मनपामार्फत योग्य पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिक व महिलांनी वेळोवेळी स्थानिक नगरसेवक व मनपा अधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. मात्र या तक्रारींचा काहीही उपयोग झाला नसून मागील पंधरा दिवसांपासून अजमेर नगर परिसरात पिण्याचे पाणी पोहचत नसल्याने येथील महिलांनी परिसरात हंडा मोर्चा काढून स्थानिक नागरसेवकांसह मनपा प्रशासनाला जाब विचारला. विशेष म्हणजे या हंडा मोर्चा दरम्यान महिलांनी भिवंडी ठाणे मार्ग देखील अडवून धरल्याने या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली होती. यावेळी महिलांनी भिवंडी मनपा प्रशासनाच्या बेजबाबदार धोरणाविरोधात व पाणी पुरवठा विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करीत घोषणा दिल्या. तसेच येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास महापालिकेवर हंडा मोर्चा काढणार असल्याची प्रतिक्रिया आंदोलक महिलांनी दिली आहे.शहरातील नागरिकांची पाणी समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने आतापर्यंत आठ ते दहा वेळा टेंडर काढले आहेत. मात्र राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर हि निविदा प्रक्रिया काढूनही तिला प्रतिसाद मिळाला नसल्याने शहरातील पाणी समस्या निकाली लागली नाही मात्र मनपा प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करते आहे अशी प्रतिक्रिया शहर अभियंता तथा पाणी पुरवठा विभाग प्रमुख एल पी गायकवाड यांनी दिली आहे. 
भिवंडीत पिण्याच्या पाण्यासाठी अजमेर नगर मधील महिला उतरल्या रस्त्यावर भिवंडीत पिण्याच्या पाण्यासाठी अजमेर नगर मधील महिला उतरल्या रस्त्यावर Reviewed by News1 Marathi on December 31, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads