लॉकडाऊन मध्ये वाढीव बिले माफ करा डोबिवलीत रिपाईच्या आंदोलनात नागरिकांची मागणी
डोंबिवली , शंकर जाधव : कोरोना काळात राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्याने सर्वसामान्य जनतेला पोट भरणे मुश्कील झाले होते.मात्र लॉकडाऊन मध्ये वाढीव वीज बिले आकारल्याने नागरिकांनी राज्य सरकारवर प्रचंड नाराजी व्यक्त केली.पाच-सहा महिने कामे नसल्याने वीज बिल भरणार कसे असा प्रश्न नागरिकांना पडला होता.नागरिकांनी आपली ही समस्या रिपाईकडे मांडली.या समस्येवर गांभीर्याने लक्ष देत गुरुवारी रिपाईच्या वतीने डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकातील महावितरण वीज कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला.त्यावेळी कार्यकारी अभियंता धनराज बिक्क्कड यांना रिपाईच्या शिष्टमंडळाने निवदेन दिले. या आंदोलनात नागरिकही सहभागी झाले होते.
या आंदोलनात डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड, डोंबिवली शहर कार्याध्यक्ष माणिक उघडे,महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा मीना साबळे,डोंबिवली शहर अध्यक्ष युवक आघाडी विकास खैरनार,डोंबिवली शहर संपर्क प्रमुख तुकाराम पवार, डोंबिवली शहर सहाय्यक सचिव समाधान तायडे, विठ्ठल खेडेकर , वॉर्ड अध्यक्ष सीमा युरवर्शी, वॉर्ड अध्यक्ष तेजस जोंधळे,शिषा वाटुरे,जिजाभाऊ गोडगे,राजेश भालेराव,पिराजी काकडे,नितीन इंगोळे,मंगेश कांबळे,चंद्रकांत वाढवे,शैलेश नेरकर,सचिन खरात,यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी माणिक उघडे म्हणाले,हाताला काम नाही,व्यवसाय ठप्प झाले तरी हे सरकार गरीब जनतेची बाजू घेत नाही. वीज बिले एवढी आली आहेत कि ती भरणे अशक्य आहेत.म्हणून जनतेची समस्या सरकारपर्यत पोहचवण्यासाठी आंदोलन करावे लागले.या आंदोलनात सहभागी झालेल्या मंगला पाटील यांचे त्रिमूर्तीनगर येथील घर लॉकडाऊन मध्ये सहा महिने बंद होते. तरीही २४ हजार वीज बिले आकारली होते.
याबाबत पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाल्या,हे अस-कससरकार आहे.गरिब जनता एवढी मोठे वीज बिले कसे भरतील याचा विचार सरकारने करायला हवा होता. आम्ही सरकारला मतदान करतो, मग आमच्या समस्या त्यांनीसोडवायला नको का ? निवडणुकीत मते मागायला येता ना मग आता जनतेला हे सरकार का विसरले ? रिपाईच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता धनराज बिक्क्कड निवेदन दिल्यानंतर त्यांनी आपले निवेदन आणि मागण्या वरिष्ठांपर्यत पोहचवीन.दरम्यान या मोर्च्यात नागरीक सहभागी झाल्याने रिपाईचे जनतेच्या समस्यांकडे लक्ष असल्याचे दिसते.

Post a Comment