Header AD

स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत विविध कामांचा महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी घेतला आढावा परिसर स्वच्छता, रंगरंगोटी सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

 

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 मोहिमेबाबत आयोजित आढावा बैठकीत बोलताना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा सोबत अतिरिक्त आयुक्त(2) संजय हेरवाडे....


ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामांचा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज आढावा घेवून मोहिमेंतर्गत शहरातील सर्व परिसराची स्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, आकर्षक रंगरंगोटी तसेच परिसर सुशोभीकरणाची सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना दिले.     

 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021 सुरू असून आज महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेवून केंद्र शासनाच्यावतीने सन 2021 साली होणा-या स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमातंर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामाचा आढावा घेतला. 


शहरातील सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती नळ व्यवस्था, पाणी पुरवठा, तलाव साफसफाई, सार्वजनिक शौचालयांना नळ संयोजने, विद्युत व्यवस्था, तसेच परिसर स्वच्छता, रंगरंगोटी तसेच परिसर सुशोभीकरण आदी गोष्टी अद्ययावत ठेवण्याचे काम सुरू असून सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.    


केंद्र शासनाच्या नवीन स्वच्छ सर्वेक्षण प्रणालीनुसार सर्व कामांचे योग्य नियोजन करण्यासोबतच स्वच्छ सर्वेक्षण या मोहिमेची नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती होण्याकरीता शहरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.


स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत विविध कामांचा महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी घेतला आढावा परिसर स्वच्छता, रंगरंगोटी सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत विविध कामांचा महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी घेतला आढावा परिसर स्वच्छता, रंगरंगोटी सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश   Reviewed by News1 Marathi on December 02, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

अखेर कल्याण मध्येही बर्ड फ्ल्यूची एन्ट्री अटाळी आणि रायत्यातील मृत कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याणमध्येही  ' बर्ड फ्ल्यू ' ची एन्ट्री झाली असून कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अटाळी आणि कल्या...

Post AD

home ads