पत्रकार नरेश पाटील यांचा सपत्नीक सन्मान
भिवंडी , प्रतिनिधी : दै लोकमतचे पत्रकार नरेश पाटील यांचा सपत्नीक सन्मान महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने नुकताच भिवंडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आला . त्यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार संघाच्यावतीने खांडपे गावात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे औचित्य साधून पत्रकार नरेश पाटील व पत्रकार संघाच्या वतीने गावातील नागरिकांसाठी वाचनालय उपलब्ध करून दिली असून या वाचनालयाचे उदघाटन देखील यावेळी करण्यात आले . याप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाथ मोहिते, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे , उद्योजक साईनाथ तारे, पडघा मंडळ अधिकारी किरण केदार, सामाजिक कार्यकर्ते हनुमान पाटील आदी मान्यवर उपस्थित होते .
त्याचबरोबर पत्रकार संघाच्यावतीने कोरोनाच्या पाश्वभूमीवर जीव धोक्यात घालून नागरीकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या खांडपे गावातील कमळ चंद्रकांत पाटील,कल्पना संतोष पाटील, निलेश सुदाम तारे, हनुमान सुंदर पाटील यांना 'कोरोना योद्धा' पुरःसरने सन्मानित करण्यात आले . याप्रसंगी संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर करडे ,भिवंडी तालुका अध्यक्ष मेघनाथ विशे ,कार्याध्यक्ष सुनील लोणे, तालुका सचिव मिलिंद जाधव , उपाध्यक्ष दीपक हिरे, शहापूर तालुका अध्यक्ष सुनील घरत, वसंत पानसरे, सचिन पोतदार ,पवार आदी सदस्य व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा कवी मिलिंद जाधव यांनी केले.
पत्रकार नरेश पाटील यांचा सपत्नीक सन्मान
Reviewed by News1 Marathi
on
December 14, 2020
Rating:

Post a Comment