सराईत गुन्हेगारां कडून घरफोडी, चैनस्नॅचिंग, मोटार सायकल चोरीचे एकूण ८ गुन्हे उघड ठाणे शहर नौपाडा पोलिसांची कारवाई
ठाणे, प्रतिनिधी : सराईत गुन्हेगारां कडून घरफोडी, चैनस्नॅचिंग, मोटार सायकल चोरीचे एकूण ८ गुन्हे उघड ठाणे शहर परिसरात घडणाया घरफोडी, चैनस्नॅचिंग, मोटार सायकल चोरी यासारख्या गुन्हयांना आळा घालण्या करीता पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास वेळोवेळी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली नौपाडा पोलीस ठाणेचे गुन्हेप्रकटीकरण कक्षाचे अधिकारी व कर्मचारी यांनी हद्दीत होणाऱ्या मालमत्ता चोरीच्या गुन्हयांचा अभ्यास करून गुप्त बातमीदारांमार्फत तसेच तांत्रिक विश्लेषनाचे अधारे एकुण चार संशयीत इसम ताब्यात घेवून त्यांचकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता त्यांनी नौपाडा पोलीस ठाणे हद्दीतील एकुण तीन घरफोडीचे, तीन चैन स्नॅचिंगचे व एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा केल्याचे उघड झाले. तसेच आरोपीतांनी विरार पोलीस ठाणे येथे देखील एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा केल्याचे उघड झाले आहे. सदर आरोपीतांना दिनांक ३०/११/२०२० रोजी अटक करण्यात आले आहे.

Post a Comment