आडीवली परिसरात रस्ता, गटार, पथदिवे लावण्यासाठी आयुक्तांना साकडे
कल्याण , कुणाल म्हात्रे : केडीएमसीतून वगळलेल्या आणि न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा केडीएमसीमध्ये समाविष्ट झालेल्या १८ गवांमधील आडीवली परिसरातील रस्ते आणि गटार बनविणे तसेच पथदिवे लावण्याच्या मागणीसाठी आई एकविरा महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सोनी संदीप क्षीरसागर यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि आमदार विश्वनाथ भोईर यांची भेट घेत निवेदन सादर केले आहे.
आडीवली विभाग केडीएमसी क्षेत्रामध्ये असून कित्येक वर्षापासून विभागात राहणाऱ्या रहिवाशी तसेच महिलांना रोज खडडेमय रस्ते तसेच गटर नसल्यामुळे इमारतीचे सर्व प्रकारचे पाणी हे रस्त्यावर येऊन चिखलमल होऊन जातो. तसेच रोडवर स्ट्रीट लाईट नसल्याकारणाने रात्री अंधाराचा सामना करावा लागतो. आडीवलीतील काकाचा ढाबा परिसर, राजाराम पाटील नगर ते प्रदिप नगर, सद्गुरु कृपा अपा, नमस्कार ढाबा ते अडिवली गाव, अॅझोलियम हॉस्पीटल रोड, सम्यक कॉलेज समोरील रस्त्याची दुरवस्था असून गटार देखील नसल्याने पाणी बाहेर येते.
विभागामधील काही महिला नोकरीसाठी ये-जा करतात. अश्या काहि महिलांना रात्री ९ नंतर घरी जाण्यासाठी मनात भिती बाळगुन जावे लागते. तसेच रात्री-अपरात्री कोणताही अनुउचित प्रकार घडु नये यासाठी या परिसारत पथदिवे बसविण्याची मागणी देखील यावेळी महिला मंडळामार्फत करण्यात आले. त्याचप्रमाणे आयुक्तांनी या परिसराचा सर्वे करून याची दखल घेण्याची मागणी सोनी क्षीरसागर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment