Header AD

बारावे गोदरेजहिल येथे अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा


■भागवत गीता जयंती निमित्त श्रीमद भागवत गीतेच्या प्रतींचे वाटप शिवसेनेने हिंदुत्वाची कास सोडली  माजी आमदार नरेंद्र पवार...


कल्याण , कुणाल म्हात्रे  :  भारताचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्र. ४ बारावे गोदरेजहिल येथे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे भगवत गीता जयंती निमित्त नागरिकांना श्रीमद भगवत गीतेच्या प्रतींचे वाटप देखील करण्यात आले. भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस श्याम मिरकुटे आणि वार्ड अध्यक्ष मोहन ढोणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  


अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असतांना त्यांनी देशाच्या विकासाठी, सुरक्षेसाठी मोठं योगदान दिलेलं आहे. ते कोणीही भारतीय विसरू शकत नाही. त्याची आठवण याठिकाणी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तर शिवसेनेने हिंदुत्वाची कास सोडून मतांच्या लांगुलचालनासाठी अजान पठणाचा कार्यक्रम केल्याने भाजपाने दरवर्षीप्रमाणेच यंदाही विशेष भागवत गीता जयंती साजरी केली आहे. कोणत्याही मुस्लीम संघटनेने अथवा पार्टीने अजान पठणाचा कार्यक्रम केला नसतांना केवळ मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्वाची कास सोडल्याची टीका यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली.


तर प्रभाग क्र. ४ मध्ये प्रभागातील सर्वांनी एकत्र येत हा कार्यक्रम यशस्वी पार पडला अशाचप्रकारे एकत्र काम करून याठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक निवडून आणणार असल्याची माहिती वार्ड अध्यक्ष मोहन ढोणे यांनी दिली.   


या कार्यक्रमास महाराष्ट्र भटके विमुक्त संयोजक माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हाञे, भाजपचे जेष्ठ नेते दिनेश तावडे, महाराष्ट्र राज्य ओबीसी सचिव अनिल पंडित, महाराष्ट्र राज्य ओबीसी कार्यकरणी सदस्य बाळाराम कराळे, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष निखिल चव्हाण, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस श्याम मिरकुटे वार्ड प्रभारी बजरंग तांगडकर, वार्ड क्र.४ अध्यक्ष व कार्यवाहक मोहन ढोणे, अशोक मिरकुटे, स्वप्निल काठे, गौरव गुजर, कल्याण जिल्हा उपाध्यक्षा प्रिति दिक्षितशनि देसाईकरविमल नागरियागौरव देसाईमहावीर जैनविरेन बागलकोटअमोल वाकळे, भावना  मनराजाआदेश जोशी,रोहन देसाईकरश्याम केणेनितिन सपकाळ आदींसह भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारावे गोदरेजहिल येथे अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा बारावे गोदरेजहिल येथे अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा Reviewed by News1 Marathi on December 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads