डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा पडदा उघडला
डोंबिवली , शंकर जाधव : गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे बंद असलेले डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा रविवारी २० डिसेंबर रोजी पडदा उघडला. 'दोन लग्नाची एक गोष्ट' या संगीत नाटकाने नाट्यगृह रसिकांना खुले झाले. या नाटकात डोंबिवलीतील कलाकारांनी सहभाग घेतला आहे. नाट्यगृहाच्या प्रवेश द्वारापाशीच असणाऱ्या नटराजाला नमन करून नाट्यगृह सुरू करण्यात आले. यावेळी महापालिकेचे सचिव संजय जाधव , लेखक आनंद म्हासवेकर , 'फ' प्रभाग अधिकारी राजेश सावंत, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे दिपाली काळे, निशिकांत रानडे, राहुल कामत, डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर जाधव, सचिव नरेंद्र थोरावडे आदी उपस्थित होते.
यावेळी सचिव संजय जाधव यांनी नाटकाला शुभेच्छा देतानाच अद्यापही शालेय घंटा वाजली नसली तरी नाट्यगृहाची तरी घंटा एकु आल्याने समाधान वाटत असल्याचे सांगितले. ' दोन लग्नाची एक गोष्ट' हे संगीत नाटकाची निर्मिती डोंबिवलीतील मराठी उद्योजक किशोर मानकामे यांनी केली असून नाटकाचे दिग्दर्शन शैलेश प्रभावळकर यांनी केले आहे. यानंतर प्रशांत दामले फॅन क्लबचे तू म्हणशील तस हे नाटक २७ तारखेला सादर करण्यात येणार असल्याची माहिती नाट्यगृहाचे व्यवस्थापक दत्तात्रय लधवा यांनी दिली. तसेच कोविडचे सर्व नियम पाळूनच नाट्यगृह खुले करण्यात आले असल्याचे त्यांनी बोलताना दिली. यावेळी नाट्यगृहाबाहेर सॅनीटायझर, मास्क आणि सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळण्यात आले.तर नाटक पाहण्यासाठी अपेक्षेप्रमाणे नाट्यरसिकांनी गर्दी केली होती.तर निर्माते किशोर मानकामे यांनी यावेळी नाट्यरसिकांचे आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा पडदा उघडला
Reviewed by News1 Marathi
on
December 20, 2020
Rating:

Post a Comment