Header AD

महिला कॉंग्रेसच्या वतीने जीवनदान अभियान

 कल्याण, कुणाल म्हात्रे  :   सद्ध्या महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सरकारच्या वतीने नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देत कल्याण पश्चिमेतील वाडेघर येथे महिला कॉंग्रेसच्या कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षा कांचन योगेश कुलकर्णी यांच्या वतीने जीवनदान अभियानांतर्गत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.


       गेले कित्येक महिने महाराष्ट्रातील जनता कोरोना सारख्या भयंकर महामारीशी लढा देत आहे. या लढाईत डॉक्टर रुग्णांना वाचविण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. अशातच आता महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताची हि कमतरता भरून काढण्यासाठी सरकारच्या वतीने नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी नागरिकांना रक्तदान करणे सोपे व्हावे यासाठी  अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा चारूलता टोकस यांच्या आदेशानुसार, माजी आमदार संजय दत्त यांच्या मार्गदर्शनाने आणि जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण डोंबिवली शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा कांचन योगेश कुलकर्णी यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.


       या शिबिरात संकल्प रक्तपेढीने रक्तसंकलनाचे कार्य केले. आयोजित या रक्तदान शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. वाडेघर परिसरातील सुमारे ५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सरकारच्या आवहानाला प्रतिसाद दिला. यावेळी आयोजक कांचन कुलकर्णी आणि संकल्प ब्लड बँक कल्याण यांच्या वतीने रक्तदान करणाऱ्या नागरिकांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देऊन गौरविण्यात आले.


ह्या शिबिराला काँग्रेस नगरसेविका जान्हवी पोटे,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनीष देसले, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आढाव, सेवादलचे जिल्हाध्यक्ष लालचंद तिवारी, सोशल मीडिया अध्यक्ष मनोज सिंग, ब्लॉक अध्यक्ष शकील खान, महिला काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष गीता चौधरी आणि शबाना शेख, निकिता पटेलपॉली जेकबवाडेघर गावचे पोलीस पाटील नरेश पाटील, कल्याण मधील मधुमेह तज्ञ डॉ.रमिझ फालके,गफ्फार शेख आदी काँग्रेस पदाधिकारीकार्यकर्त्यांनी भेट दिली.

महिला कॉंग्रेसच्या वतीने जीवनदान अभियान महिला कॉंग्रेसच्या वतीने जीवनदान अभियान Reviewed by News1 Marathi on December 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

रुग्णालयाच्या पॅसेज मध्ये ऑक्सिजन लावून रुग्णांवर उपचार

■कल्याण डोंबिवलीत आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र....   कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  :   रुग्णालयाच्या पॅसेजमध्ये ऑक्सिजन लावून रुग्णांवर उपचार...

Post AD

home ads