Header AD

भारत बंदला कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचा पाठींबा रिक्षा बंद ठेवून शेतकऱ्यांचे करणार समर्थन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात शेतकरी आदोलंनास जाहीर पाठिबां देण्यासाठी मंगळवारी ८ डिसेंबररोजी भारत बंदची हाक देण्यात आली असून या भारत बंदला कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने देखील पाठींबा दिला असून मंगळवारी रिक्षा बंद ठेवून शेतकऱ्यांचे समर्थन करण्यात येणार आहे.


        दिल्लीच्या सीमेवर देशातील शेतकऱ्यांनी केद्रं सरकारने शेतकरी विरोधी कायदे संमत केले ते कायदे रद्द व्हावे या मागणीसाठी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. शेतकरी विरोधी कायदे केल्याने या देशातील शेतकरी संपूर्णपणे नष्ट होऊन शेती व्यवसाय हा बड्या मक्तेदारभांडवलदारांच्या ताब्यात जाऊन शेतकरी उद्ध्वस्त होण्याची दाट भीती आहेया देशातला शेतकरी हा वाचला पाहिजे त्याला संरक्षण मिळाले पाहिजे म्हणून कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ शेतकरी आदोलंन व भारत बंद ला जाहीर पाठिबां देत आहे.


      मंगळवारी ८ डिसेबंर रोजी सर्व कोकण विभागातील रिक्षा टॅक्सी संघटना पदाधिकारीकार्यकर्तेयांनी रिक्षा टॅक्सी चालकांना अवगत करुन रिक्षा टॅक्सी बंद ठेऊन भारत बंद व शेतकरी आदोलंनास पाठिबां द्यावा असे आवाहन कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी केले आहे.

भारत बंदला कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचा पाठींबा रिक्षा बंद ठेवून शेतकऱ्यांचे करणार समर्थन भारत बंदला कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचा पाठींबा रिक्षा बंद ठेवून शेतकऱ्यांचे करणार समर्थन Reviewed by News1 Marathi on December 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यातील लॉज व हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे... ठाणे , प्रतिनिधी  :    ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये ...

Post AD

home ads