युवक संघटन पक्षाची ताकद असते ती कोणी ही दुर्लक्षून चालणार नाही मेहबूब शेख
भिवंडी , प्रतिनिधी : युवक संघटन या पक्ष बांधणी मधील महत्वाचा घटक असून त्यास कोणीही दुर्लक्षून चालणार नाही परंतु त्यासाठी युवकांनी सुध्दा पक्ष कार्यात झोकून देऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी केले आहे .ते भिवंडी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते .या प्रसंगी शहराध्यक्ष भगवान टावरे ,भगवान टावरे ,सरचिटणीस अँड सुनील पाटील ,महिला अध्यक्षा स्वाती कांबळे , जब्बार काझी , जावेद फारुखी ,फौजिया मर्चंट , युवक अध्यक्ष असिफ खान आदी व्यासपीठावर उपस्थित होते .
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या वॉटर गटर मीटर या मुद्द्यांवर लढविल्या जातात त्यासाठी युवक संघटनेने नागरीकां मध्ये जाऊन त्यांच्या समस्यांची सोडवणूक करून नागरीकांना दिलासा देण्याचे काम करणे गरजेचे आहे .युवकांनी मनावर घेतले तर ते कोणतीही सत्ता उलथवून लावू शकतात एवढी ताकद युवा शक्ती मध्ये आहे .त्यासाठी युवक पदाधिकाऱ्यांनी अधिक जोमाने काम केल्यास भिवंडी महानगरपालिके चा पुढील महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल असा विश्वास मेहबूब शेख यांनी व्यक्त केला .
राज्यात दोन धर्मात,जातिजातीत द्वेष पसरविणाऱ्या पक्षाला बाजूला सारून महाविकास आघाडी चे सरकार राज्यात सत्तेवर बसविण्यात शरद पवार यांचे योगदान मोठे आहे त्यामुळे सर्व देशाचे लक्ष शरद पवार साहेबांकडे लागले असताना त्यांच्या कार्याकडे बघून युवकांनी अधिक जोमाने काम करावे असा सल्ला मेहबूब शेख यांनी शेवटी दिला. या कार्यक्रमा दरम्यान शहराध्यक्ष भगवान टावरे , फौजिया मर्चंट यांची सुद्धा समयोचित भाषणे झाली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक शहराध्यक्ष असिफ शेख यांनी करताना संपूर्ण शहरात युवक आघाडी मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
कार्यक्रमा च्या शेवटी राष्ट्रवादी युवक भिवंडी शहर कार्यकारणी जाहीर करून प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली .तर कार्यक्रमास शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
युवक संघटन पक्षाची ताकद असते ती कोणी ही दुर्लक्षून चालणार नाही मेहबूब शेख
Reviewed by News1 Marathi
on
December 28, 2020
Rating:

Post a Comment