Header AD

भाजपचे ठाण्यावर लक्ष - युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशावर ठाण्याला संधी

 

■युवा मोर्चा प्रदेश सचिवपदी ठाण्यातील ओंमकर भरत चव्हाण...


ठाणे, प्रतिनिधी   :  महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आणि संख्याबळाच्या तुलनेत ठाणे जिल्हा हा महत्वाचा आहे. ठाण्यावर भाजप नेत्यांचीही नजर असून ठाण्यात संघटन वाढविण्यासाठी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीत ठाण्याला संधी दिल्याचे चित्र आहे. युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी ठाण्यातील उच्चशिक्षित तरुण ओंमकर चव्हाण यांची निवड करण्यात आलेली आहे. सचिवपदी ओमकार चव्हाण यांची नियुक्ती झाल्यानंतर ठाण्यातील भाजपच्या तसेच युवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ओमकार चव्हाण यांना लहान पणापासून त्याच्या वडिलांकडून बाळकडू मिळाले आहे. सामाजिक जीवनात वावरत असताना सामाजिक उपक्रम तसेच गोरगरीब माणसाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी चव्हाण धावून जात असतात, प्रभागातील नागरिकांचा दांडगा संपर्क असल्याने भाजपने ओंमकार चव्हाण यांची प्रदेश सचिव पदी नियुक्ती केली आहे. 


विधानसभा निवडणूक दूर असल्या तरीही वर्षभरावर आलेल्या पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाण्यात भाजप नियुक्त्यांवर जोर देत आहे. ओंमकर चव्हाण हा उच्चशिक्षित तरुण असून त्याच्यावर महाराष्ट्रातील  युवकाच्या  समस्या, नोकरी, ऍडमिशन, भाजपशी युवकांना जोडो अभियान, पर्यावरण, आणि उच्च शिक्षित तरुणांना भाजप युवा मोर्चात समाविष्ठ करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी त्याला नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा दिल्या. दरम्यान आमदार आशिष शेलार, संजय केळकर, ठाणे शहर भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे,नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षासाठी योगदान देणार असल्याचे यावेळी ओमकार चव्हाण यांनी सांगितले.

भाजपचे ठाण्यावर लक्ष - युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशावर ठाण्याला संधी भाजपचे ठाण्यावर लक्ष - युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशावर ठाण्याला संधी Reviewed by News1 Marathi on December 13, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

गरिबीचे नाटक करून लग्न करून ती करायची नवाऱ्यांची फसवणूक , भिवंडीत झाला प्रकार उघड

■फसवणूक करणाऱ्या तीन महिलांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.... भिवंडी दि. १५ (प्रतिनिधी  )  फसवणुकीचा अनेक घटना आपल्या आजूबाजूला नेहमी...

Post AD

home ads