बंदिस्त पॅलेसजवळील गतिरोधक बनला जीवघेणा एका दिवसात सात अपघात
डोंबिवली , शंकर जाधव : वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर गतीरोधक बनवले जातात. मात्र हेच गतिरोधक जीवघेणे ठरत असल्याने वाहनचालकांनि पालिकेच्या दुर्लक्षित कामाकानावर नाराजी व्यक्त केली आहे.डोंबिवली पूर्वेकडील बंदिस्त पॅलेसजवळील गतिरोधकाच्या मोठ्या आकारामुळे व कचरा गाडीतील तेलासारखा द्रव्यपदार्थ सांडल्याने निसरड्या रस्त्यावर शुक्रवारी एका दिवसात तब्बल सात मोटरसायकलस्वार पडल्याच्या घटना घडल्या. जवळील दुकानदार आणि नागरिकांनी दुचाकीस्वराच्या मदतीला धावले.सुदैवाने यात दुचाकीस्वार जखमी झाले नाही. मात्र भविष्यात या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.डोंबिवली शहर कॉग्रेस कमिटीचे प्रकाश सागरे यांनी यासंदर्भात सार्वजनिकबांधकाम विभागाचे उपायुक्त सुधाकर जगताप यांना पत्र दिले.
दोन महिन्यापूर्वी बंदिस्त पॅलेसजवळ पालिकेने गतीरोधक बनवले होते.मात्र गतीरोधाकाचा आकार मोठा झाला असून याकडे पालिका प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. परिणामी सदर रस्त्यावर दुचाकीस्वार आल्यावर त्यांना याचा लांबून अंदाज येत नसल्याने गतीरोधकास वाहने आढळून दुचाकीस्वार पडतात. शुक्रवारी गगतीरोधकाच्या आधी कचरा गाडीतील तेलासारखा द्रव्यपदार्थ सांडल्याने निसरडा रस्ता झाल्याने तब्बल सात दुचाकीस्वार पडले.
मोठ्या आकाराच्या गतीरोधकामुळे नेहमी होणारे अपघात आणि शुक्रवारी तब्बल सात अपघात झाल्याने नागरिक प्रचंड संतापले होते. .डोंबिवली शहर कॉग्रेस कमिटीचे प्रकाश सागरे यांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपायुक्त सुधाकर जगताप यांना पत्र दिले. सागरे यासह अमीन शेख, पवन भिसे, गणेश वटवल, गणेश मोरे यांनी पालिका प्रशासनाने या घटनांची दाखल घेऊन गतिरोधकाची उंची कमी करावी आणि त्यावर पांढरे पट्टे रंगवावे अशी मागणी केली आहे.

Post a Comment