भिवंडीत ८४ उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक कार्यालयात तोबा गर्दी ,सोशल डिस्टेंसिंग चा शासकीय यंत्रणे समोर उडाला बोजबारा
भिवंडी , प्रतिनिधी : ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडू लागला असून २३ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली ,परंतु त्या नंतर २५,२६,२७ डिसेंबर असे सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्या आल्याने उमेदवारी अर्ज स्विकारणे बंद होते. त्यामुळे २८ डिसेंबर रोजी भिवंडी तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीं मधील ५७४ सदस्य निवडीणूकी करीता २१ ग्राम पंचायत मधील ८४ उमेदवारानी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले
मात्र इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केल्याने सोशल डिस्टेंसिंग चा शासकीय यंत्रणे समोरच पुरता बोजबारा उडाला होता .
भादवड येथील स्व.संपदा नाईक सभागृहात तहसीलदार अधिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यालय थाटण्यात आले असून तेथेच ५६ ग्रामपंचायतीं साठी नियुक्त ४१ निवडणूक निर्णय अधिकारी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी बसले असून त्याठिकाणी उमेदवार त्यांचे संर्यहक मोठ्या संख्येने हजर झाले होते .विशेष म्हणजे नजीकच्या क्रीडांगणावर वाहन तळ बनविण्यात आले असून त्या ठिकाणी शेकडो चारचाकी वाहनांची गर्दी झाली होती. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्यांवर ,अथवा सार्वजनिक कार्यक्रम करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन कारवाई करीत असताना या ठिकाणी कारवाई नव्हे परंतु पुढील दोन दिवस विशेष खबरदारी घेऊन व्यवस्था न केल्यास या हुन अधिक गर्दी जमू शकते एवढे नक्की .
भिवंडीत ८४ उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक कार्यालयात तोबा गर्दी ,सोशल डिस्टेंसिंग चा शासकीय यंत्रणे समोर उडाला बोजबारा
Reviewed by News1 Marathi
on
December 28, 2020
Rating:

Post a Comment