खारीगांव (पाखाडी) गावंदेवी मैदान येथे महिलांचे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
कळवा , प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीमुळे गेले ८ महिने लॉकडाउनच्या काळात खारीगांव गावंदेवी मैदान बंद ठेवण्यात आले होते. पालकमंत्री मा.एकनाथजी शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, शिवसेना उपनेते मा.दशरथ (दादा) पाटील, महापौर मा. नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रयत्नाने गावंदेवी मैदानाचे सुशोभिकरण करून खारीगांव, पारसिकनगर, आनंदविहार परिसरातील नागरिकांसाठी व मुलांसाठी गावंदेवी मैदान खुले करून देण्यात आले.
त्यामुळे नागरिकांनी मा.उमेश पाटील यांचे आभार व्यक्त केले. तसेच आज दिनांक ६.१२.२०२० रोजी महिलांसाठी खास क्रिकेट सामने आयोजित केले.सामन्यांकरिता खारीगांव, पारसिकनगर परिसरातून 7 संघाचे सामने असून दिवसभर चालू राहणार आहेत. या सामन्यांचे उद्घाटन मा.उमेश पाटील यांनी केले. उमेश पाटील यांनी आपले मत व्यक्त केले कि येणाऱ्या काही दिवसात ठाणे महानगरपालिकेच्या निधीमधून जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम व खुला मंच बांधण्याची मंजुरी करून घेण्यात येणार आहे.
तसेच मैदानात झाडे जगवा झाडे लावा हा संदेश देऊन वृक्षारोपण कार्यक्रम सुद्धा आयोजित केला होता. याप्रसंगी राकेश पाटील, जय पाटील, सुनील ससाणे, नंदकुमार सुर्वे, बाळा म्हात्रे, पांडुरंग पवार,महेश गवारी, सिकंदर केणी, रविंद्र जावळे, दुर्गेश चाळके, गणेश बोऱ्हाडे, सचिन चव्हाण, राहुल बोऱ्हाडे, किशोर देशमुख व इतर उपस्थित होते.
खारीगांव (पाखाडी) गावंदेवी मैदान येथे महिलांचे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
Reviewed by News1 Marathi
on
December 06, 2020
Rating:

Post a Comment