अभय योजनेचा कालावधी वाढवि ण्याची आमदार विश्वनाथ भोईर यांची मागणी
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या अभय योजनेचा लाभ शहरातील सर्व सामान्य नागरिक, कामगार वर्ग व करदाते यांना अधिकाधिक मिळावा यासाठी अभय योजनेचा कालावधी वाढवण्यात यावा अशी मागणी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांना पत्राद्वारे केली आहे.
आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात आमदार भोईर यांनी सामान्य नागरीकांची व्यथा मांडत अभय योजनेचा कालावधी वाढवण्यात यावा अशी मागणी केली आहे. कोरोना काळात लोकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक मंदीची झळ बसली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने तसेच व्यवसायही ठप्प झाल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. कुटुंबाच्या दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करतांना नाकी नऊ निघत आहेत. त्यामुळेच अभय योजनेचा कालावधी वाढवल्यास सामन्यांना थोडाफार का होईना दिलासा मिळेल अशी आशा आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment