Header AD

ईव्ही बॅटरीच्या योग्य पुनर्वापरा साठी एमजी मोटरचा पुढाकार

 

टीईएस-एएमएम या जागतिक ई-वेस्ट रिसायकलिंग सेवा प्रदात्याशी केला करार 


मुंबई, १५ डिसेंबर २०२० : ग्रीन मोबिलिटीमध्ये भारताचे संक्रमण अधिक सुलभ करण्यासाठी एमजी मोटर इंडिया आता मजबूत ईव्ही इन्फ्रास्ट्रक्चर उभारत आहे. यासाठीच कंपनीने आता टीईएस-एएमएम या जागतिक ई-वेस्ट रिसायकलिंग आणि एंड-टू-एंड सेवा प्रदात्याशी करार केला आहे. एमजी झेडएस ईव्हीच्या बॅटरी पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत आणि पुनर्वापराकरिता सुरक्षित असतील याची सुनिश्चिती या भागीदारीतून होईल. यातून झेडएस ईव्ही मालकांना इकॉलॉजिकल फुटप्रिंटबाबत एक मोठे समाधान प्राप्त होईल.

टीईएस-एएमएम हा आशियातील एकमेव ली-आयन बॅटरी रिसायकलिंग प्लांट आहे. १८००१:२००७/आर२ (रिस्पॉन्सिबल रिसायकलिंग) सह मल्टीपल मॅनेजमेंट सिस्टिममध्ये प्रमाणित असलेल्या मोजक्याच कंपन्यांपैकी ती एक आहे. वर्धित मालमत्ता पुनर्प्राप्तीसाठी यात एक प्रकारची मेकॅनिकल-हायड्रो मेटलर्जिकल प्रक्रिया वापरली जाते जेणेकरून पर्यावरणासाठी चांगले व सुरक्षित आहे.


एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, “एमजीमध्ये आम्ही एक समग्र ईव्ही इकोसिस्टिम तयार करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. जे अधिक हरित व स्वच्छ अशा भारताच्या मोहिमेला पाठींबा देते. बॅटरीचे व्यवस्थापन हे अतिशय गुंतागुंतीचे असून त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे, असा आमचा विश्वास आहे. टीईएस-एएमएमसोबत आमची भागीदारी याच धर्तीवर करण्यात आली आहे. यामुळे बॅटरी केवळ व्हॅल्यू चेनमध्येच प्रवेश करू शकते असे नाही तर इको-फ्रेंडली प्रोटोकॉलचे अनुसरण करत त्यांचा पुनर्वापरही होऊ शकतो. भारताच्या चिरंतन ई-मोबिलिटी भवितव्याच्या दृष्टीने हे दीर्घकालीन पाऊल आहे, असे आम्हाला वाटते.”

एमजीने २०२० च्या सुरुवातीला झेडएस ईव्ही लाँच केली. राष्ट्रीय व प्रादेशिक लॉकडाऊन असतानाही आतापर्यंत तिच्या १००० पेक्षा जास्त युनिटची विक्री झाली आहे. पावरफुल ईव्ही ही आकर्षक लुकमध्ये असून ८.५ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास असा तिचा वेग आहे. जास्तीत जास्त ५० मिनिटात ती ० ते ८० टक्के पर्यंत चार्ज होते.

ईव्ही बॅटरीच्या योग्य पुनर्वापरा साठी एमजी मोटरचा पुढाकार ईव्ही बॅटरीच्या योग्य पुनर्वापरा साठी एमजी मोटरचा पुढाकार Reviewed by News1 Marathi on December 15, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads