Header AD

बनावटीचा गावठी कट्टा, रिव्हॉल्व्हर व जिवंत काडतुसह इसमास अटक कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

डोंबिवली , शंकर जाधव  :  एक इसम बेकायदेशीर अग्निशास्त्र विक्री करण्यासाठी डोंबिवली पूर्वेकडील भोपर कमानीजवळ एक इसम येणार आल्याची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार  दत्ताराम भोसले  यांना  खबऱ्यामार्फत  माहिती मिळाली.पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून इसमास अटक केली.पोलिसांनी अटकटक आरोपिकडून एक लोखंडी बनावटीचा गावठी कट्टा, एक लोखंडी देशी बनावटीचे गावठी पिस्टल  रिव्हॉल्व्हर व ८ जिवंत काडतुसे  असा मुद्देमाल हस्तगत केला.


सागर देवीप्रसाद सिंग ( ३० , रा.  नांदिवली ,डोंबिवली पुर्व)असे अटक आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक  संजु जाॅन  यांच्या आदेशा नुसार पोलीस पथकाने भोपर कमानीजवळ, मानपाडा रोड,डोंबिवली पुर्व येथे सापळा रचला. अतिशय शिताफीने आरोपी  सागर देवीप्रसाद सिंग ( ३० , रा.  नांदिवली ,डोंबिवली पुर्व)  याला ताब्यात घेतले. याच्याकडील एक लोखंडी बनावटीचा गावठी कट्टा, एक लोखंडी देशी बनावटीचे गावठी पिस्टल  रिव्हॉल्व्हर व ८ जिवंत काडतुसे  असा मुद्देमाल हस्तगत गेला. अटक आरोपी सागर सिंग विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात  गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


याआरोपी सागर याच्याकडे बेकायदेशिर अग्निशस्त्र कोठुन आणले, कोणाला विक्री करणार होता, काही घातपात करण्याचे तयारीत होता याबाबत तपास सुरु आहे.सदरची कारवाई  पोलीस आयुक्त  विवेक फणसाळकर, पोलीस सहआयुक्त   सुरेश मेकला, अपर पोलीस आयुक्त  संजय येनपुरे,   पोलीस उप आयुक्त (गुन्हे)   लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त किसन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि संजु जाॅन यांच्या आदेशाने विशेष पथक पो.उप.नि.नितिन मुदगुन,पो.उप.नि.मारुती दिघे, पोलीस अंमलदार दत्ताराम भोसले,अरविंद पवार, मंगेश शिर्के,अजित राजपूत,प्रकाश पाटील, हरीचंद्र बांगारा यांनी केली.
बनावटीचा गावठी कट्टा, रिव्हॉल्व्हर व जिवंत काडतुसह इसमास अटक कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई बनावटीचा गावठी कट्टा,  रिव्हॉल्व्हर व  जिवंत काडतुसह इसमास अटक कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई Reviewed by News1 Marathi on December 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

क्विक हिलने आर्थिक वर्ष २०२१ मध्ये मजबूत वृद्धी नोंदवली

मुंबई, १८ मे २०२१ :  क्विक हिल टेक्नोलॉजीज लिमिटेड (क्विक हिल), भारतातील ग्राहक, बिझनेस, सरकारसाठी सायबर सिक्युरिटी आणि डेटा प्रोटेक्शन सोल्...

Post AD

home ads