परफेक्ट हॉट वॉटर’साठी क्रॉम्प्टनचा रॅपिड जेट प्लस इन्स्टण्ट वॉटर हीटर आणून हिवाळ्यातील थंडीवर करा मात
मुंबई, डिसेंबर ९, २०२० : आरोग्य आणि वैयक्तिक स्वच्छता आता आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पायरीवरील प्राधान्य झाले आहे. हिवाळा सुरू होत असल्याने योग्य तापमानाचे पाणी देणाऱ्या वॉटर हीटरचा शोध घेणे ही काळाची गरज आहे.
आधुनिक तंत्रज्ञान, वैविध्यपूर्ण उत्पादन सुविधा आणि विश्वास व दर्जेदार कामगिरीचा ७५ वर्षांचा वारसा या पायावर उभ्या असलेल्या क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या भारतातील नवोन्मेषकारी, उच्च कामगिरी करणाऱ्या खात्रीशीर व दर्जेदार गो-टू-ब्रॅण्डने रॅपिड जेट प्लस इन्स्टण्ट वॉटर हीटर ही श्रेष्ठ दर्जाची पाणी गरम करण्याची क्षमता असलेली श्रेणी बाजारात आणली आहे. या श्रेणीतील वॉटर हीटर स्थापनेसाठी सुलभ, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण डिझाइनचे असून, तुम्हाला ‘परफेक्ट हॉट वॉटर’ देण्यासाठी तयार करण्यात आले आहेत.

Post a Comment