कांदिवली येथे संविधान उद्देशिकेचे जाहीर वाचन करून व सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करून महामानवाला अभिवादन
मुंबई , प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर न जाता आपापल्या परिसरात संविधान उद्देशिकेचे जाहीर वाचन करून महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना महापरीनिर्वाणदिनी अभिवादन करावे असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे यांनी केले होते. तसेच १ महिन्यापासून ते या बाबत पूर्ण महाराष्ट्र भर प्रबोधन करत होते.
हाच मुद्दा घेवून सुसंयोग महिला बचत गटाच्या महिलांनी घरोघरी जनजागृती करून व नियम पाळून आपल्याच परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचे ठरवले होते त्यासोबत जनकल्याण सेवा मित्र मंडळ. च्या युवा कार्यकर्त्यांनी भीम नगर दामू नगर कांदिवली पूर्व मुंबई या ठिकाणी संविधानाच्या उद्देशिकेचे जाहीर वाचन करून महामानवास अभिवादन केले. यावेळी महिला नेत्या सुनंदाताई संजय बोर्डे अध्यक्ष सुसंयोग महिला बचत गट यांनी दीपप्रज्वलन करून तसेच सविता साबळे यांनी अगरबत्ती पेटवूनकेले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात केली.या अभिवादन सभेत माजी श्रामनेर विलास रोहिमाल, यांनी मार्गदर्शन केले. या अभिवादन सभेस सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे, दीपक जमादार उद्धव उघडे सुरेश कांबळे विजय पाखरे विमल मकरंद सुनिता उघडे जितो टाक ज्ञानदेव येडे आसाराम प्रमुख यांच्यासह र्याच महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी साक्षी पाखरे या बालिकेने संविधानाच्या प्रस्ताविक याचे वाचन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय बोर्डे यांनी केले.

Post a Comment