सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा पडदा उघडणार डोंबिवलीतील कलाकार सादर करणार संगीत नाटक
डोंबिवली , शंकर जाधव : गेल्या ९ महिन्यापासून बंद असलेले डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृह उद्या रविवार २० डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. संपूर्ण जगावर कोरीनाचे संकट घोंगावत असल्यामुळे गेली नऊ महिने नाट्यगृह देखील बंद करण्यात आले होते.
मात्र हळूहळू सर्वच गोष्टी सुरळीत होत असून डोंबिवली सारख्या सांस्कृतिक नगरीत असणारे सावित्रीबाई फुले नाट्यगृह देखील पुन्हा सुरू होणार आहे. या नाट्यगृहात डोंबिवलीतील कलाकार संगीत नाटक सादर करणार असून दोन लग्नाची एक गोष्ट असे या संगीत नाटकाचे नाव आहे.तर या नाटकाचे निर्माते किशोर मानकामे आणि डोंबिवलीत राहणारे शैलेश प्रभावळकर आणि कलाकार डोंबिवलीतील रहिवाशी आहेत.
या नाटकाच्या पहिला प्रयोगाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर जाधव, सचिव नरेंद्र थोरावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर २७ तारखेला प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनचे `तू म्हणशील तस` हे नाटक सादर होणार आहे. एकंदरीतच सांस्कृतिक शहराला टाळेबंदी मुळे आलेली मरगळ लवकरच दूर होणार असल्याचे पहावयास मिळत आहे.

Post a Comment