Header AD

भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात सोयी सुविधांची वणवा

  

◆आमदारांच्या तक्रारीनंतर राज्याच्या आरोग्य संचलिकांनी घेतला रुग्णालयाचा आढावा ...


भिवंडी , प्रतिनिधी   :   भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी शहरात एकमेव शासकीय रुग्णालय असलेल्या स्व इंदिरागांधी रुग्णालयात सेवा सुविधानच बोजवारा उडाला असल्याची तक्रार भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे नुकताच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशना दरम्यान केली होती. यावेळी आमदार रईस शेख यांनी  उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधांकडे लक्ष देण्याची विनंती मंत्री टोपे यांच्याकडे केली होते . त्यासंदर्भातील आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन देखील त्यांनी आरोग्य मंत्री टोपे यांच्याकडे दिले होते . 


आमदार शेख यांच्या मागण्यांची व तक्रारीची दाखल आरोग्य मंत्र्यांनी घेत राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ संध्या तायडे यांना भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते आरोग्य मंत्र्यांच्या निर्देशांनंतर गुरुवारी स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात आमदार रईस शेख यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या बैठकीत राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ संध्या तायडे , उपसंचालिका डॉ. राठोड मॅडम , ठाणे जिल्हा रुग्णालय शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार , , मनपाचे  वैद्यकीय अधिकारी डॉ कारभारी खरात , इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेश मोरे आदी उपस्थित होते . 


इंदिरा गांधी रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला आहे मात्र तशा सोयी सुविधा रुग्णालयात नसल्याने रुग्णांसह नातेवाईकांची पुरता गैरसोय होत आहे . यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाकडून साडेदहा कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे यातील दोन कोटींचा निधी रुग्णालयासाठी वापरण्यात आला असून चार कोटी रुपयांचा निधी सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पडून आहे . येत्या १५ दिवसात हि निधी वापरण्यात यावी असे निर्देश आरोग्य विभागाच्या संचालकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या निधीमुळे रुग्णालयात २०० बेड ची व्यवस्था करण्यात येणार आहे . तर भिवंडीत १०८ क्रमांकाच्या ऍम्ब्युलन्सची प्रवास मर्यादा फक्त भिवंडी ते ठाणे पर्यंत होती ती भिवंडी ते मुंबई पर्यंत करण्यास आरोग्य संचालिका यांनी तत्काळ मान्यता दिली. 


त्यामुळे येथील रुग्णांना शासकीय रुग्णवाहिकांचा लाभ मिळणार आहे. तर इंदिरा गांधी रुग्णालयात असलेल्या चार रुग्णवाहिका सध्या नादुरुस्त असल्याने खासगी रुग्णवाहिकांकडून रुग्णांची प्रचंड आर्थिक लूट करण्यात येत असल्याने शहरातील रुग्णांसाठी आमदार फंडातून वातानुकूलित रुग्णवाहिका देण्याचे यावेळी आमदार शेख यांनी यावेळी जाहीर1 केले असून येत्या पंधरा दिवसात हि रुग्णवाहिका रुग्णालयास देण्यात येण्याचेही यावेळी शेख यांनी जाहीर केले. याचबरोबर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची असलेली कमतरता लवकरच भरून काढण्याचे आश्वासन देखील याप्रसंगी राज्याच्या आरोग्य संचालिका यांनी आमदार शेख यांना दिले आहे.
भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात सोयी सुविधांची वणवा भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात सोयी सुविधांची वणवा Reviewed by News1 Marathi on December 17, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads