Header AD

डोंबिवलीतील दानशूर व्यक्तिमत्व प्रल्हाद म्हात्रे यांच्या हस्ते 'सेल्फी विथ आई माऊली' विजेत्यांना सन्मान चिन्ह


डोंबिवली ,  शंकर जाधव   :  जगदंब आई माऊली नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष अनिरुद्ध गायकवाड यांनी ऍडव्होकेट प्रदीप बावस्कर यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी `सेल्फी  वि आईमाऊली`स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना व सहभागी स्पर्धकांना डोंबिवलीचे दानशूर व्यक्तिमत्व प्रल्हाद म्हात्रे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र  आणि तुळशीचे रोप देऊन गौरविण्यात आले.या बक्षीस समारंभात डोंबिवलीतील दानशूर व्यक्तिमत्व प्रल्हाद म्हात्रे, समाजसेवक हिंमत म्हात्रे,डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार शंकर जाधव, नामवंत वकील प्रदीप बावसकरसमाजसेविका काशीबाई जाधवमिस इंडिया विजेती ऐश्वर्या जोशी आणि राष्ट्रीय पदक विजेते पत्रकार तसेच साप्ताहिक `मानव एकता`चे ठाणे जिल्हा प्रतिनिधी अवधुत सावंत उपस्थित होते. 


स्पर्धेत प्रथम क्रमांक ज्योती परबद्वितीय क्रमांक अनिता तारा गंगावणे आणि तृतीय क्रमांक अनिता ठक्कर यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि तुळशीचे रोप तर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.तर कुटुंबामध्ये उपयोगी पडेल असे घर संसाराची उपयोगी उपकरणे बक्षीस म्हणून  प्रल्हाद म्हात्रे यांनी दिले. तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना आदिशक्ती नारी पुरस्कार देऊन त्यांनाही प्रमाणपत्र आणि आणि बक्षीस म्हणून घरगुती उपयोगी उपकरणे दानशूर व्यक्तिमत्व प्रल्हाद दादा म्हात्रे यांनी देऊ केली.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामवंत वकील प्रदीप बावस्कर यांनी केले.  या कार्यक्रमात रंगत आणण्यासाठी धनश्री बावस्कर यांनी सादर देवीच्या
अवतारात उत्तम नाट्य सादर केले व त्यास   प्रल्हाद म्हात्रे यांनी उत्तम प्रतिसाद दिला. तसेच महिलांना काही प्रश्नमंजुषा विचारून त्यांनी ही त्यास काही चोख उत्तरे दिली. असे विविध कार्यक्रम सुद्धा सादर करण्यात आले आणि उपस्थितांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

डोंबिवलीतील दानशूर व्यक्तिमत्व प्रल्हाद म्हात्रे यांच्या हस्ते 'सेल्फी विथ आई माऊली' विजेत्यांना सन्मान चिन्ह डोंबिवलीतील दानशूर व्यक्तिमत्व प्रल्हाद म्हात्रे यांच्या हस्ते 'सेल्फी विथ आई माऊली' विजेत्यांना सन्मान चिन्ह   Reviewed by News1 Marathi on December 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads