Header AD

मनसे कामगार कर्मचारी सेनेच्या केडीएमसी अध्यक्षपदी मनोज घरत

 कल्याण ,कुणाल  म्हात्रे  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार कर्मचारी सेनेच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका अध्यक्षपदी माजी नगरसेवक मनोज घरत यांची निवड करण्यात आली आहे.  


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने व मनसे नेते तथा आमदार राजु पाटील, कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण, मनसे सरचिटणीस तथा महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना अध्यक्ष संदिप देशपांडे, कार्याध्यक्ष संतोष धुरी, सरचिटणीस उत्तम सांडव व अखिल चित्रे, राजेश उज्जैनकर यांच्या मार्गदर्शनाने मनोज घरत यांची महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना (कल्याण डोंबिवली महानगरपालिका ) अध्यक्षपदी नेमणुक करण्यात आली आहे. आपल्याला दिलेली जबाबदारी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी घरत यांनी दिली.

मनसे कामगार कर्मचारी सेनेच्या केडीएमसी अध्यक्षपदी मनोज घरत मनसे कामगार कर्मचारी सेनेच्या केडीएमसी अध्यक्षपदी मनोज घरत Reviewed by News1 Marathi on December 01, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads