Header AD

भारत बंदच्या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचा डोंबिवलीतून पाठिंबा

 

 



डोंबिवली, शंकर जाधव : शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत शेतमालाला किमान हमी भावाचे संरक्षण कायद्याद्वारे मिळावेबाजार भाव पडल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा माल सरकारने विकत घ्यावा आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून तात्काळ ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची तरतूद कायद्यात करण्यात यावी या प्रमुख मागणीसह शेतकरी हिताच्या इतर मागण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने   अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये समर्थन देण्यासाठी डोंबिवली शहरांमध्ये इंदिरा चौक येथे वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहर कमिटीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष सुरेंद्र ठोके,क.डो.जिल्हा संघटक मिलिंद साळवेउपाध्यक्ष राजु काकडेअशोक गायकवाडठाणे जिल्हा सचिव रेखाताई कुरवारे,बाजिराव मानेरामकिसन हीगेसंतोष खंदारेयोगेश सुतारसंजय गौतम यासह अंसख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

भारत बंदच्या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचा डोंबिवलीतून पाठिंबा भारत बंदच्या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचा डोंबिवलीतून पाठिंबा Reviewed by News1 Marathi on December 08, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यातील लॉज व हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे... ठाणे , प्रतिनिधी  :    ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये ...

Post AD

home ads