Header AD

अनैतिक संबधाचे ब्लॅकमेलिंग ठरलं 'त्या' विधवेच्या निर्घृण हत्येचे कारण हत्ये प्रकरणी विवाहित प्रियकर गजाआड




भिवंडी ,  प्रतिनिधी  :   ब्युटी पार्लरचा व्यवसाय  करणाऱ्या विधवा महिलेची  तिच्या राहत्या घराच कोणी नसताना  पाच दिवसापूर्वी  अज्ञात मारेकऱ्याने  धारधार शस्त्राने  निर्घृण हत्या  केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.  हि घटना  भिवंडी  शहरातील तीनबत्ती परिसरात असलेल्या हाफसनआळी परिसरात असलेल्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर  घडली  होती.  लक्ष्मीबाई भुरला ( वय ३८ ) असे निर्घृण हत्या झालेल्या विधवा महिलेचे नाव आहे.  अखेर पोलिसांनी तांत्रिक व मोबाईल लोकेशनच्या आधारे हत्येप्रकरणी तिच्या विवाहित प्रियकराला भिवंडी शहर पोलिसांनी गजाआड केले. आहे. प्रकाश पाटील (वय, ६९,रा. खारेगाव, ठाणे ) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. 

 

◆अनैतिक संबधातून मृत विधवा करायची 'त्याला' ब्लॅकमेल


आरोपी प्रकाश पाटील हे भिवंडीतील एका बँकेत अंकाऊंड म्हणून तीन वर्षांपूर्वी कार्यरत असताना मृत लक्ष्मीबाईशी त्याच्याशी ओळख झाली. त्यांनतर काही दिवसात या दोघांमध्ये अनैतिक संबध निर्माण झाले होते. तर दुसरीकडे आरोपी प्रकाश सेवानिवृत्त झाल्याने त्याच्याकडे मृतक विधवा ब्लॅकमेल करून आपले अनैतिक संबंधाची माहिती तुझ्या घरच्याना देईल अशी धमकी देऊन त्याच्याकडे  घर घेण्यासाठी ९ लाख रुपयांसाठी  तगादा लावला होता. यामुळे आरोपीला राग येऊन त्याने  तिची ५ दिवसापूर्वी घरात कोणी नसताना  लक्ष्मीबाई  यांच्या शरीरावर धारधार शस्त्राने ९ ते १० वार करत गळा चिरून त्यांची निर्घृण  हत्या केली होती. 

 

◆ मुलगा रात्रीपाळी करून आल्यानंतर घटना आली उघडकीस .. 


मृतक लक्ष्मीबाई भुरला  यांचा  ब्युटी पार्लरचा व्यवसाय होता.  त्यांना दोन मुलं आहेत.  त्यापैकी एक मुलगा त्याच्या सोबत राहत असून तो  शुक्रवारी नेहमीप्रमाणे रात्रपाळीसाठी कामाला गेला होता. त्याच दरम्यान मृत महिला घरात एकटी असतांना कोणीतरी अज्ञात मारेकऱ्याने घरात घुसून निर्घृण  हत्या केली.   मृतकचा  मुलगा रात्रपाळीचे काम आटपून शनिवारी सकाळी घरी आला असता घरचा दरवाजा लॉक असल्याने त्याने उघडून बघितले.  असता घरात रक्ताच्या थारोळ्यात आईचा मृतदेह पाहून त्याला  धाकच बसला होता.  

 

◆आरोपीला करणार न्यायालयात हजर 


घटनेच्या दिवशी घराचा दरवाजा आतून उघडण्यात आला असल्याने व घरातील वस्तूंची चोरी झाली नसल्याने हि हत्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीने केली असल्याचा प्राथमिक अंदाज त्यावेळी पोलिसांकडून व्यक्त केला होता. पोलिसांनी याच दिशेने तपास करीत प्रकाश पाटील याला खारेगाव मधून ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे अधिक चौकशी पोलिसांनी केली असता त्याने हत्येची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोकाटे यांनी दिली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरेला धारदार चाकू आणि मोटरसायक हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीला  आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले 


अनैतिक संबधाचे ब्लॅकमेलिंग ठरलं 'त्या' विधवेच्या निर्घृण हत्येचे कारण हत्ये प्रकरणी विवाहित प्रियकर गजाआड अनैतिक संबधाचे ब्लॅकमेलिंग ठरलं 'त्या' विधवेच्या  निर्घृण हत्येचे कारण हत्ये प्रकरणी विवाहित प्रियकर गजाआड  Reviewed by News1 Marathi on December 24, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads