Header AD

राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नगरसेवक कांच्या घरवापसी साठी जिल्हा अध्यक्षांचे प्रयत्नडोंबिवली , शंकर जाधव : २०१५ साली पालिकेचा निवडणुकीत अनेक नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपच्या पक्षात प्रवेश केला.आपल्या प्रभागात भक्कम स्थान असलेल्या या नगरसेवकांनी आपपे नगरसेवक पद कायम राहण्यासाठी केलेले हे प्रयत्न नागरिकांच्या नजरेतून सुटले नाही.सोडून गेलेल्या पक्षाला पुन्हा राजकीय गनिमी कावा करत राजकारणातील किंग समजल्या जाणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्रात पुन्हा सत्ता आणली.त्यानंतर सर्वांचे लक्ष पालिका निवडणूकिकडे लागले असताना सर्व पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे आणि कार्यकर्त्याची चर्चा सुरु झाली.आपले नगरसेवक पुन्हा आपल्या पक्षात येणार का ? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला असताना पक्षातील वरिष्ठ नेते यावर कोणती भूमिका घेतली यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. याबाबत राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी पक्षवाढीसाठी जे काही करता येईल ते करू असे सांगितले, मात्र पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवकांची घरवापसी होईल का याचे ठाम उत्तर दिले नाही.


डोंबिवली शहर सत्कार सभारंभ व संघटनात्मक बांधणी मार्गदर्शन व बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकारी आणि मार्गदर्शन केले .डोंबिवली पूर्वेकडील पेडसेनगर येथील भगवती सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी १४३ विधानसभा क्षेत्र डोंबिवली शहराच्या वतीने सत्कार समारंभ व संघटनात्मक बांधणी मार्गदर्शन व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे,कार्याध्यक्ष डॉ.वंडार पाटील, डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राजेश शिंदे, कार्याध्यक्ष भाऊ पाटील, माजी जिल्हा कार्याध्यक्ष विलास म्हात्रे, माजी नगरसेवक दीपक ठाकूर, डोंबिवली विधानसभा क्षेत्र माजी अध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे,विधानसभा महिला शहाराध्यक्ष संगीता मोरे, ज्येष्ठ कार्यकर्ते के.एस.सरकटे,माजी नगरसेवक सुरेश जोशी, ज्येष्ठ कार्यकर्त्या वंदना गायकवाड,शैलेश टोकरे, उमेश पाटील, संतोष थोरात, वैभव मोरे,स्नेहश घोलपकर, प्रणव राय, रामदास पांचाळ आदि पदाधिकारी आणि कार्यकर्त्ये उपस्थित होते. 


यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बैठकीत आपली मते मांडताना पक्ष वाढीसाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.यावेळी जिल्हाअध्यक्ष जगन्नाथ शिंदे म्हणाले,पक्षाची बांधणी करणे आवश्यक आहे.डोंबिवली पूर्व व पश्चिमेकडे पक्षाची कार्यालये उघडून कार्यकर्त्यांनी कार्यालयात यायला हवे.पदे हवी असल्यास आपल्या कामाची माहिती द्या असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.तर कार्याध्यक्ष डॉ.वंडार पाटील यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात सर्व कार्यकर्त्यांना पक्षात न्याय मिळेल असे सांगितले. पुढे डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राजेश शिंदे यांनी पक्षातील गटबाजी बंद होणे आवश्यक असताना कामे करताना कार्यकर्त्यांना त्रास होणार नाही याकडे लक्ष द्यावे असे सांगितले.


कार्याध्यक्ष भाऊ पाटील म्हणाले,पक्षातील कार्यकर्त्याला काम करताना जेव्हा जेव्हा आमची मदत लागेल त्या त्यावेळी आम्ही येऊन असे आश्वासन दिले. माजी जिल्हा कार्याध्यक्ष विलास म्हात्रे, माजी नगरसेवक दीपक ठाकूर, डोंबिवली विधानसभा क्षेत्र माजी अध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे,विधानसभा महिला शहाराध्यक्ष संगीता मोरे, ज्येष्ठ कार्यकर्ते के.एस.सरकटे,माजी नगरसेवक सुरेश जोशी, ज्येष्ठ कार्यकर्त्या वंदना गायकवाड यांनीही या बैठकीत पक्ष वाढीसाठी काही सूचना मांडल्या.बैठकीनंतर जिल्हाअध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांना आगामी केडीएमसी निवडणुकीत पक्ष सोडून गेलेल्या नगसेवका बाबत विचारले असता ते म्हणाले, पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात यायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे.पक्षवाढीसाठी त्यांच्या घरवापसीसाठी प्रयत्न करू असे सांगितले.

राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नगरसेवक कांच्या घरवापसी साठी जिल्हा अध्यक्षांचे प्रयत्न राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नगरसेवक कांच्या घरवापसी साठी जिल्हा अध्यक्षांचे प्रयत्न Reviewed by News1 Marathi on December 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads