Header AD

अनुदानित शिक्षणच बंद करण्याचा महाविकास आघाडीचा डाव अनिल बोरनारे




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  शाळेतील शिपायांची पदे ठोक पद्धतीने भरून अनुदानित शिक्षणच बंद करण्याचा महाविकास आघाडीचा डाव असून तातडीने हा शासन निर्णय मागे घेण्याची मागणी  भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी शासनाकडे केली आहे.


भाजपा सरकारने शाळांसाठी जाहीर केलेले अनुदान थांबविणेअंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतरांचा १९ महिन्यांचे वेतन न देणेशिक्षकांच्या भरतीमध्ये पारदर्शकता आणणारी पवित्र पोर्टलची भरती एक वर्ष न करणे म्हणजे अनुदानित शिक्षण संपविण्याचा प्रकार असल्याचेही बोरनारे यांनी म्हटले आहे.


शाळांच्या व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सेवक वर्ग हा महत्वाचा घटक असतांना देखील त्या पदाचे खाजगीकरण करणे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून धोक्याचे आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले तरी शिक्षणातील गोंधळ दूर होत नसून शैक्षणिक संस्थांना आरटीई प्रवेशाची प्रतिपूर्तीची लाखो रुपयांची थकबाकीसंस्थांच्या वेतनेतर अनुदानाची रक्कम अद्यापही अनेक शाळांना पोहचले नसल्याने शाळांचा इतर खर्च कसा भागवावा असा प्रश्न शाळांना पडला आहे.

अनुदानित शिक्षणच बंद करण्याचा महाविकास आघाडीचा डाव अनिल बोरनारे अनुदानित शिक्षणच बंद करण्याचा महाविकास आघाडीचा डाव अनिल बोरनारे Reviewed by News1 Marathi on December 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads