Header AD

कल्याण डोंबिवलीत ११९ नवे रुग्ण तर २ मृत्यू

 

■५,७४९ एकूण रुग्ण तर १०९३ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत ११६ रुग्णांना डिस्चार्ज....


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ११९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ११६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    

 

आजच्या या ११९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५,७४९ झाली आहे. यामध्ये १०५८ रुग्ण उपचार घेत असून ५४,५९८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०९३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ११९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१६कल्याण प – ३२डोंबिवली पूर्व ५१डोंबिवली प – १५मांडा टिटवाळा -४तर मोहना येथील १ रूग्णाचा समावेश आहे. 

 

        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ८ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ६ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून६ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून१० रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटरमधून   उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ११९ नवे रुग्ण तर २ मृत्यू कल्याण डोंबिवलीत ११९ नवे रुग्ण तर २ मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कचरा फेकणाऱ्यांनी पालिकेच्या भरारी पथकाला केली मारहाण दोघांना अटकेत

डोंबिवली ,  शंकर जाधव   :  कल्याण डोंबिवली महापालिकेचा स्वच्छ शहरात वरचा क्रमांक यावा तसेच शहर स्वच्छ राहावे यासाठी पालिकेने रात्रीचा कचरा ...

Post AD

home ads