कार अपघात दोन जणांचा मृत्यू तर एक जखमी
कल्याण , कुणाल म्हात्रे : रस्ताच्या कडेला कार उभी करून तीन मित्र बोलत असतानाच त्याच सुमारास उल्हासनगरहुन कल्याणाच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने उभ्या असलेल्या कारला धडक दिली. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हि घटना कल्याण - उल्हासनगर मार्गावरील वालधुनी परिसरात घडली आहे. भीषण अपघातात विजय सोनवणे हे जागीच ठार झाले तर गणेश दराडे यांचा हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात भरधाव कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मृतक कार चालक गणेश दराडे आणि त्यांचे सहकारी बालकृष्ण बोडेकर हे काल रात्रीच्या सुमारास कल्याण - उल्हानसागर मार्गावरून वालधुनी रस्त्यावर कारमध्ये जात होते. त्यावेळी त्यांचा एक सहकारी विजय सोनवणे रस्त्यात भेटला. मृतक विजय सोनवणे दिसल्यानंतर गणेश दराडे यांनी कार रस्त्याच्या कडेला थांबवली. आणि तिघेही कारच्या मागे उभे राहून बोलत असताना उल्हासनगरहुन कल्याणच्या देशाने जाणाऱ्या भरधाव कार चालकाने या तिघांना जोरदार धडक दिली. त्यानंतर हि भरधाव कार विजेच्या खांबाला जाऊन धडकली. या अपघातात विजय सोनवणे जागीच ठार झाला. तर गणेश दराडे यांचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर बाळकृष्ण बोडेकर यांचावर उपचार सुरु आहे.
मृतक गणेश दराडे यांच्या पेस्टकंट्रोलचा व्यवसाय आहे. तर जखमी बाळकृष्ण बोडेकर आणि मृतक विजय सोनवणे हे दोघे मृतक गणेशकडे कामाला आहेत. या भीषण अपघाताच्या घटनेचा पुढील तपास महात्मा फुले पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर चव्हाण हे करीत आहेत.

Post a Comment