Header AD

महाराष्ट्रातील खासदारांना रेल्वेच्या समस्या मांडण्यासाठी वैयक्तिक वेळ द्या ! खासदार राजन विचारे यांची मागणी
ठाणे,  प्रतिनिधी  :  दरवर्षीप्रमाणे रेल्वे प्रशासनाच्या विविध समस्या व काही सूचना सुचविण्यासाठी खासदार  व रेल्वे महाव्यवस्थापक  यांच्या  दालनात होणारी बैठक रद्द करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे  घेण्यात आली  या बैठकीला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक. श्री. संजिवजी मित्तल व मध्य रेल्वेचे रेल्वे प्रबंधक श्री. शलभजी गोयल तसेच एम आर  व्ही सी चे चेअरमन रवी खुराना तसेच इतर खासदार उपस्थित होते या बैठकीदरम्यान महाराष्ट्रातील प्रत्येक खासदाराला त्यांच्या समस्या व सूचना मांडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वैयक्तीक वेळ देणे गरजेचे आहे अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी या बैठकीदरम्यान केली.


तसेच या बैठकीला खासदार राजन विचारे यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील इ. स. 16 एप्रिल 1853 रोजी ठाणे ते बोरीबंदर अशी भारतातील पहिली रेल्वे सुरू  झाली होती. त्या ठाणे रेल्वे स्थानकातील धोकादायक झालेली इमारत पाडून नव्याने इमारतीचे काम केव्हा सुरू होणार आहे असे प्रश्न रेल्वे प्रशासनाला केले. त्यावर रेल्वे प्रशासनाने या कामासाठी निधीची उपलब्धता करण्यात आलेली आहे. ही इमारत पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे लवकरच याचे काम सुरू होईल असे रेल्वे प्रशासनाने खासदार राजन विचारे यांना सांगितले. 


त्याचबरोबर हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावरील अरुंद रेल्वे पुलावरील नवीन गर्डर टाकण्याचे काम केव्हा सुरू होणार आहे. त्यावर हे काम डिसेंबर महिन्यात सुरु होऊन त्यावरील मार्गीकेचे काम फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करून देऊ असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. त्याचबरोबर कोपरी सॅटिस 2 च्या इमारतीच्या आराखड्याच्या मंजुरीसाठी रेल्वेच्या (ISRDCA) इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑथॉरिटी कडून विलंब लागत आहे. त्यावर रेल्वे प्रशासनाने लवकरच मान्यता मिळवून घेऊ असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना दिले.


ठाणे रेल्वे स्थानकातील अतिरिक्त वाढणारा भार कमी करण्यासाठी महत्त्वकांक्षी प्रकल्प कळवा ऐरोली एलिव्हेटेड या रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची गती वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासनाला सांगितले त्याचबरोबर ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी टाळण्याकरिता तसेच रेल्वे फेऱ्या वाढविण्‍यासाठी आवश्यक असलेल्या पाचव्या व सहाव्या लाईनचे हे काम संथगतीने सुरू असल्याची विचारणा केली असता रेल्वे प्रशासनाने हे काम 30 जून 2021 पर्यंत पूर्ण करून देण्याचे खासदार राजन विचारे यांना कळविले आहे. 


तसेच ठाणे रेल्वे स्थानकात मुंबई व कल्याण दिशेस धोकादायक झालेल्या पादचारी पुलाच्या बांधकामासाठी ठाणे महानगरपालिकेकडून उपलब्ध केलेल्या निधीतून कामे अद्याप सुरू न केल्याची विचारणा केली असता रेल्वे प्रशासनाने मुंबई दिशेने असणाऱ्या पादचारी पुलाचे काम 10 डिसेंबर 2020 रोजी व कल्याण दिशेस असणाऱ्या पादचारी पुलाचे काम 15 डिसेंबर 2020 रोजी सुरू करण्यात येईल असे खासदार राजन विचारे यांना कळविण्यात आले आहे.


ठाणे रेल्वे स्थानकातील पार्किंग प्लाझा इमारतीचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली तसेच ठाणे रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या रेल्वे वसाहतीतील तीन धोकादायक इमारती पाडण्यात आल्या आहेत या इमारतीच्या जागेवर नवीन अत्याधुनिक पार्किंग सहित असलेली इमारत उभी करावी. जेणेकरून पार्किंगमुळे रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होईल व रेल्वे वसाहती ही तयार होतील अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.याचबरोबर खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वे मार्गावरील 15 डब्यांची लोकल फेऱ्या , महिला विशेष लोकल फेऱ्या, स्थानकातील सरकते जिने, नवीन तिकीट खिडकी, शौचालय, यांची संख्या वाढविण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील खासदारांना रेल्वेच्या समस्या मांडण्यासाठी वैयक्तिक वेळ द्या ! खासदार राजन विचारे यांची मागणी महाराष्ट्रातील खासदारांना रेल्वेच्या समस्या मांडण्यासाठी वैयक्तिक वेळ द्या ! खासदार राजन विचारे यांची मागणी Reviewed by News1 Marathi on December 02, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads