काॅग्रेसचे ठाण्यात असललेली शक्ती अधिकाधिक मजबूत करण्याची जबाबदारी काँग्रेस कार्यकर्त्यांची विक्रांत चव्हाण
ठाणे , प्रतिनिधी : 136 वर्धापन दिन साजरा करण्याचा आनंद असला तरि ठाण्यातील काँग्रेसचं असलेले अस्तित्व अधिकाधिक मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून आपण कीती सक्रीय आहोत यांचा विचार तुम्ही आम्ही सर्वांनीच केला पाहिजे,प्रत्येक सेल, विभाग मजबूत होणे गरजेचे असून लवकरच एक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे ठाणे शहर जि काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.
अखिल भारतीय काँग्रेसचा 136 व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे शहर काँग्रेसच्या वतीनं "काँग्रेसचा इतिहास"यावर मार्गदर्शन करताना विक्रांत चव्हाण बोलत होते याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, देशाच्या पातळीवर काय चाललंय यावर चर्चा करण्यापेक्षा आम्ही ठाण्यातील काँग्रेससाठी काय करतोय यावर विचार मंथन झाले पाहिजे, आगामी महानगरपालिका निवडणुकीत आपण कशा पद्धतीने यशस्वी होउ शकतो यांची आखणी केली पाहिजे असेही त्यांनी बोलताना सांगितले.
या प्रसंगी जेष्ठ नेते राम भोसले,महेंद्र म्हात्रे, सुरेश खेडे पाटील व मोहम्मद अब्दुल्ला यांनी काँग्रेस इतिहासावर आपले विचार मांडले.
कार्यक्रमात शहर काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे यांनी सुत्रसंचालन केले तर प्रदेश सदस्य राजेश जाधव,सुखदेव घोलप,महिला अध्यक्ष शिल्पा सोनोने,जेष्ठ उपाध्यक्ष भालचंद्र महाडीक,रमेश इंदिसे,विजय बनसोडे,धर्मवीर मेहरोल, ब्लाॅक अध्यक्ष संदिप शिंदे,राजू शेट्टी,राजू हैबती,शहर काँग्रेसचे हिन्दुराव गळवे,प्रसाद पाटील,शिरीष घरत,झिया शेख,महेश पाटील, पांडुरंग शेवाळे,स्वप्निल कोळी,युवक काँग्रेसचे स्वप्निल भोईर,विनित तिवारी,अझिज ओझा,महिला काँग्रेसच्या फातिमा आपा,रेखा मिरजकर,संजय घाग आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment