Header AD

शस्त्रक्रियेबाबत केंद्राने दिलेल्या निर्णयाच्या समर्थनार्थ 'नीमा'सह आयुर्वेदिक डॉक्टर संघटनांचा पुढाकार

 


कल्याण, कुणाल म्हात्रे   :  केंद्र सरकारने आयुष डॉक्टरांना बहाल केलेल्या शस्त्रक्रियेच्या निर्णयाचे 'नीमा' (नॅशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशन) संघटनेसह आयुर्वेदिक व्यासपीठच्या डॉक्टरांकडून जोरदार स्वागत केले जात आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि आयएमए डॉक्टरांच्या भूमिकेला विरोध दर्शवण्यासाठी 'नीमा'सह आयुर्वेदिक डॉक्टरांनी आज पिंक रिबीन लावून काम केल्याचे दिसून आले.


केंद्र सरकारच्या सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने (सीसीआयएम) आयुर्वेदिक डॉक्टरांना ५८ शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाला इंडियन मेडीकल असोसिएशनने तीव्र विरोध दर्शवत आज देशव्यापी कामबंद आंदोलनाची हाक दिली होती. आयुर्वेदिक
डॉक्टरांना अत्याधुनिक शस्त्रक्रियेचा सराव नसल्याने अशा व्यक्तींमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकतो असा दावा इंडियन मेडीकल असोसिएशनकडून करण्यात आला आहे.


मात्र 'नीमा'सह आयुर्वेदिक डॉक्टरांच्या संघटनांनी आयएमएचे दावे फेटाळून लावले आहेत.  आयएमएचा संप हा जनतेची दिशाभूल करणारा आणि केवळ सरकरवर दबाव आणण्यासाठी केला गेल्याची प्रतिक्रिया 'नीमासंघटनेचे कल्याण डोंबिवली अध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी दिली. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज आम्ही पिंक रिबीन लावून काम केल्याचेही त्यांनी सांगितले.


तर कोवीड काळामध्ये आयुष डॉक्टरांनी उल्लेखनीय काम केले आहे. मात्र सरकारच्या निर्णयाला आयएमए विनाकारण विरोध करत आहे. त्यांना (आयएमए) विरोध करण्यासाठी महाराष्ट्रात आयुष कृती समिती स्थापन झाली असूनन त्यामध्ये 'नीमा'सह आयुर्वेद व्यासपीठ संघटनेचे सर्व डॉक्टर एकत्र आल्याची माहिती आयुर्वेद व्यासपीठ संघटनेच्या डॉ. अभिजित ठाकूर यांनी दिली.


यावेळी 'नीमा'चे डॉ. सुनिल पांडेडॉ. विजय भिरुडडॉ. दिपक पोगाडेडॉ. सोनाली फोंडगेडॉ. सुनंदा जाधवडॉ. शिल्पा बुलबले यांच्यासह आयुर्वेदिक व्यासपीठ संघटनेचे डॉ. विपुल कक्कड आणि कल्याण डोंबिवलीतील अनेक सदस्य उपस्थित होते. दरम्यान नीमा आणि आयुर्वेद व्यासपीठच्या प्रतिनिधींनी यावेळी कल्याण तहसीलदार कार्यालयात सरकारच्या निर्णयाला समर्थन देणारे निवेदन सादर करीत आपला भक्कम पाठिंबा दर्शवल्याचे दिसून आले.

शस्त्रक्रियेबाबत केंद्राने दिलेल्या निर्णयाच्या समर्थनार्थ 'नीमा'सह आयुर्वेदिक डॉक्टर संघटनांचा पुढाकार शस्त्रक्रियेबाबत केंद्राने दिलेल्या निर्णयाच्या समर्थनार्थ 'नीमा'सह आयुर्वेदिक डॉक्टर संघटनांचा पुढाकार Reviewed by News1 Marathi on December 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यातील लॉज व हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे... ठाणे , प्रतिनिधी  :    ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये ...

Post AD

home ads