Header AD

संघानुकुल जीवन जगलेल्या ‘तपस्वी मुकुंदरावांचे’ कार्य आजही पथदर्शक आहे शरदराव ओगले


 डोंबिवली , शंकर जाधव  :  संसार व समाजातील सर्व जबाबदाऱ्या यशस्वी पार पडणारे बहुआयामी तपस्वी मुकुंदराव’ स्वतःस्थितप्रज्ञ राहून संघानुकुल जीवन जगले. त्यांचे कार्य आजही पथदर्शी आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत सह-कार्यवाह शरदराव ओगले यांनी अभिनव विद्यामंदिर येथील डॉ. आनंदीबाई गोपाळ सभागृहात बोलताना केले. कै.मुकुंदराव वझे जन्मशताब्दी सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळेस व्यासपीठावर कल्याण जिल्हा संघचालक डॉ. विवेक मोडकछत्रपती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष  फडके व खासदार कपिल पाटील हे उपस्थित होते.


यावेळेस मान्यवरांच्या हस्ते सा. वार्तासूत्र यांनी प्रकाशित केलेल्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. संपादक अरुण देशपांडे व अतिथी संपादक रत्नाकर फाटक उपस्थित होते. ओगले यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले की, “वयाच्या दहाव्या वर्षी आईचे निधन झाल्यावर १७ व्या वर्षी पितृछत्रही हरपल्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी प. पू. डॉ. हेडगेवार यांच्याकडून संघाची प्रतिज्ञा घेऊन वयाच्या २२ व्या वर्षी मुकुंदराव संघप्रचारक निघाले. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत तरी आपल्याला प्रचारक राहायला परवानगी मिळावी अशी श्री गुरुजींकडून परवानगी घेऊन १९४८ साली थांबल्यावर विवाह केला. पण संघाने सांगितले म्हणून पुन्हा एकदा त्यांनी १९६८ पर्यंत जनसंघाचे काम केले. 


जनसंघाच्या तिकिटावर त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणूक लढवली. त्यानंतर पुन्हा संघकाम करताना टिटवाळा येथे छत्रपती शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यांच्यामुळे ठाणे जिल्ह्यात आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळवणारा संस्थेचा हा पहिला शिक्षक ठरला. मुख्याध्यापक म्हणून त्यांनी केलेले काम आजही अनेकांच्या स्मरणात आहे.स्वर्ग सोपान’ संस्थेची स्थापना करून अंत्येष्टीचे समान इतर कोणीही घरात ठेवायला तयार नसताना स्वतःच्या घरात ठेऊन एक आदर्श निर्माण केला. 


कल्याण रक्तपेढीचे काम स्थीरावण्यासाठीही त्यांचा मोठा सहभाग होता. मुकुंदरावांना प.पू.डॉ. हेडगेवारांचा परीसस्पर्श झाला होता व मुकुंदराव स्वतःसाठी परीस झाले होते. राष्ट्रकार्य प्रथम’ ही उक्ती आचरणात आणताना त्यांनी आजन्म संघाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विवेक मोडक यांनी आपल्या भाषणात मुकुंदरावांसारख्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांमुळेच गेली ७५ वर्षे संघ गंगा अखंडपणे वाहत असल्याचे सांगितले. त्यांनी तयार केलेल्या संघ संस्कृतीचे जतन करणे हे आजच्या कार्यकार्त्यांसामोरचे खरे आव्हान आहे असे ते शेवटी म्हणाले. 


मुकुंदरावांसारख्या कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या पायामुळेच भारतीय जनता पार्टीची सत्ता देशात येऊ शकली असे प्रतिपादन यावेळेस खा. कपिल पाटील यांनी केले. वामनराव साठेमाजी मंत्री जगन्नाथ पाटीलभास्करराव मराठे यांनी मुकुंदरावांच्या आठवणी यावेळेस सांगितल्या. तर त्यांच्या कुटुंबियांतर्फे त्यांचा नातू विनीत यांनी घरगुती आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छत्रपती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष फडके यांनी केले तर सूत्रसंचालन हर्षद कुळकर्णी यांनी केले. आशुतोष देवधर यांनी आभारप्रदर्शन केल्यावर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रविण देशमुखमिलिंद कुलकर्णीमोहन आघारकर इत्यादींनी मेहनत घेतली.

संघानुकुल जीवन जगलेल्या ‘तपस्वी मुकुंदरावांचे’ कार्य आजही पथदर्शक आहे शरदराव ओगले संघानुकुल जीवन जगलेल्या ‘तपस्वी मुकुंदरावांचे’ कार्य आजही पथदर्शक आहे शरदराव ओगले Reviewed by News1 Marathi on December 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads