भिवंडी शहरात स्वच्छता अभियान संपंन
भिवंडी, प्रतिनिधी : आज रोजी प्रभाग समिती ०२ व प्रभग समिती 3 अंतर्गत स्व. राजीवगांधी चौक कल्याण नाका ते भादवड पाईपलाईन पर्यत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.या अभियानाची सुरवात प्रभाग समिती क्रमांक 3 च्या सभापती नंदिनी महेंद्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी नगरसेविका मनीषा दांडेकर, उपायुक्त मारुती गायकवाड, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, मुख्य आरोग्य अधिकारी हेमंत गुळवी, अग्निशमन अधिकारी राजेश पवार,प्रभाग समिती क्रमांक 1 चे सहायक आयुक्त दिलीप खा, प्रभाग समिती क्रमांक 3 चे सहायक आयुक्त सुनील भालेराव,प्रभाग समिती क्रमांक 2 कार्यालय अधीक्षक सोमनाथ सोष्टे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, सर्व आरोग्य निरीक्षक अशोक संखे, जयवंत सोनावणे, एम.पी.विषे, हरेश भंडारी, एफ. एफ. गोम्स उपस्थितीत होते. या साफसफाई मोहिमेत सफाई,गटर सफाई, औषध फवारणी करून प्लास्टिक जमा करण्यात आले सदर ठिकाणी , मुख्य आरोग्य निरीक्षक , सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment