कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्य़ाचे काम महिन्या भरात सुरु होणार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली आयुक्तांची भेट
कल्याण ,कुणाल म्हात्रे : कल्याण पूर्वेतील ड प्रभाग कार्यालयानजीक उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पूर्णाकृती पूतळ्य़ाच्या कामाला येत्या महिन्याभरात सुरुवात केली जाईल अशी माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबडेकर सार्वजनिक जयंती समितीच्या अध्यक्षा भारती जाधव आणि इतर पदाधिकारयांनी यासंदर्भात खासदार शिंदे यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीपश्चात खासदार शिंदे यांनी जाधव यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. रखडलेल्या पुतळ्य़ाच्या कामासंदर्भात खासदारांनी आयुक्तांसोबत चर्चा केली. येत्या महिन्याभरात पुतळा उभारण्याचे काम सुरु केले जाईल असे आश्वसन आयुक्तांनी दिल्याची माहिती खासदारांनी दिली आहे.
या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी लागणाऱ्या संबंधित विभागांच्या मंजूरी मिळवण्यासंदर्भात तसेच पुतळा उभारणीच्या कामाकरिता लागणारा निधी संदर्भात चर्चा करण्यात आली. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या पुर्णाकृती पुतळा उभारणीसाठी लागणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही यावेळी खासदारांनी दिली.
या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, नगरसेवक निलेश शिंदे, महेश गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षा भारती जाधव, माजी अध्यक्ष भारत सोनावणे, विवेक जगताप, माजी सचिव सुमेध हुमणे उपस्थित होते.

Post a Comment