मीरा भाईंदर येथील पूर्णवेळ कायम स्वरूपी शिबीर कार्यालयाचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, प्रतिनिधी : मीरा भाईंदर मधील नागरिकांसाठी स्वतंत्र पूर्णवेळ कायमस्वरूपी शिबीर कार्यालय व्हावे म्हणून ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत आज मीरा भाईंदर येथे पूर्णवेळ कायमस्वरूपी शिबीर कार्यालयाचे उद्घाटन सोहळ संपन्न झाला.श्री. अनिल परब म्हणाले," मीरा भाईंदर शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना परिवहन विभागाच्या कामासाठी ठाणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागत होते. परंतु यामुळे आता मीरा भाईंदर मधील नागरिकांना परिवहन विभागाशी निगडित सर्व सुविधा येथेच उपलब्ध होणार आहेत.
हे शिबीर कार्यालय यापुर्वीच सुरू करण्याचे नियोजन होते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बरीचशी कामे दुर्दैवाने थांबली होती. या कामाला गती देऊन आज हे कार्यालय येथील जनतेसाठी सुरू झाले आहे असे श्री. परब यांनी यावेळी सांगितले.हे कार्यालय सुरू करावे अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक व खासदार राजन विचारे यांनी केली होती. त्याला तात्काळ प्रतिसाद देत आज परिवहनमंत्री यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.

Post a Comment