Header AD

कल्याण डोंबिवलीत ४७ नवे रुग्ण तर १ मृत्यू

 

■५७,२२० एकूण रुग्ण तर १०९८ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत १२४ रुग्णांना डिस्चार्ज....


कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ४७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


 

आजच्या या ४७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५७,२२० झाली आहे. यामध्ये १०२२ रुग्ण उपचार घेत असून ५५,१०० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ४७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-कल्याण प – १९डोंबिवली पूर्व १२डोंबिवली प – १२ रूग्णाचा समावेश आहे. 


 

        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी २ रुग्ण हे टाटा आमंत्रा मधून, १२ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून,  १० रुग्ण डोंबिवली जिमखाना समर्पित रुग्णालय येथून, ५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ४७ नवे रुग्ण तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत  ४७ नवे रुग्ण तर १ मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads