Header AD

ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न
डोंबिवली , शंकर जाधव : श्रीकला संस्कार गेली ३८ वर्षे मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते. संस्थेने सप्टेंबर मध्ये बालनाट्य लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते.यासाठी महाराष्ट्र व थेट अमेरिकेतून एकूण ३२ मान्यवर लेखकांचा सहभाग लाभला होता.तसेच या लॉकडाऊन मधील दुसरा उपक्रम एकपात्री अभिनय स्पर्धा घेतल्यात आली होती. ही स्पर्धा वय वर्षे ८-१५ व वय वर्षे १६ व पुढील अश्या दोन गटांत घेण्यात आली होती. 


सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्रातुन एकूण १०७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.प्राथमिक फेरीतून प्रत्येक गटातून १० स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. स्पर्धेची अंतिम फेरी झूम अँपवर घेण्यात आली. स्पर्धेसाठी सिनेनाट्य अभिनेत्री मृणाल चेंबूरकरलेखिका व अभिनेत्री अश्विनी मुकादमआणि जेष्ठ दिग्दर्शक राजन वाडेकर यांनी परीक्षण करून तसेच योग्य मार्गदर्शन करून निकाल जाहीर केला. 


प्राथमिक परिक्षणातून सुवर्णा मादुस्करठाणे यांना विशेष लक्षवेधी सादरीकरण पारितोषिकाने गौरविण्यात आले. स्पर्धेवेळी कलाकारांचे कौतुक करण्यासाठी आनंद म्हसवेकरमाधव जोशीसुरेखा जोशीज्योती दातेआरती मुनिश्वर असे अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू संकेत ओकमधुरा ओक व वृशांक कवठेकर यांनी निष्ठेने सांभाळली आणि खुशाल भगत व मयुरेश केळुसकर यांचे बहुमोल सहकार्य केले. कार्यक्रमाचे संयोजन संस्थेच्या सर्वेसर्वा दिपाली काळे व भाग्यलक्ष्मी पडसलगीकर यांनी केले.अंतिम फेरी निकाल
गट क्र. १ (वय वर्षे ८-१५)
प्रथम क्रमांक - वैष्णवी थरकुडेतळेगाव दाभाडे
द्वितीय क्रमांक - समृद्धी मोगलनाशिक
तृतीय क्रमांक - अन्वित हर्डीकरपुणे
उत्तेजनार्थ - वंशिका इनामदारडोंबिवली
उत्तेजनार्थ - सुमेधा चौधरीठाणे

------------------------------------------------------------------

गट क्र. २ (वय वर्षे १६ व पुढील)
प्रथम क्रमांक - सखी गुंडयेवरळी
द्वितीय क्रमांक - सुबोध चितळेठाणे
तृतीय क्रमांक - मेघा कांबळीडोंबिवली
उत्तेजनार्थ - राधिका महांकाळदादर
उत्तेजनार्थ - अजिंक्य टेकाळेवरळी

ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न  ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न Reviewed by News1 Marathi on December 31, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याची शुभारंभ

कळवा  , अशोक  घाग  :   प्रभाग क्रमांक 9 स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून खारीगाव येथील दत्तवाडी परिसरातील विघ्नहर्त...

Post AD

home ads