वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
डोंबिवली , शंकर जाधव : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहर कमिटीच्या वतीने डोंबिवली शहरांमध्येच महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डोंबिवली शहरामध्ये अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर शहरातील सर्व महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. यांप्रसंगी वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेंद्र ठोके,क.डो.जिल्हा संघटक मिलिंद साळवे, उपाध्यक्ष राजु काकडे, भारतीय बौद्ध महासभेचे डोंबिवली शहर अध्यक्ष गौतम सुतार, अशोक गायकवाड, अर्जुन केदार, बाबासाहेब घुगे, गणेश गायकवाड,विजय इंगोले, योगेश सुतार, रामकिसन हीगे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
Reviewed by News1 Marathi
on
December 06, 2020
Rating:

Post a Comment