Header AD

माणिक त्रिंबक उघडे यांची डोंबिवली शहर कार्याध्यक्ष पदी निवड

 



डोंबिवली , शंकर जाधव   :  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी माणिक त्रिंबक उघडे यांची कार्याध्यक्ष पदी निवड केली. माणिक उघडे यांच्या निवडीने रिपाई आठवले गटात आनंदाचे वातावरण झाले आहे. उघडे यांच्या सर्वसमावेशक सामाजिक कार्यपद्धतीमुळे पक्ष वाढीस मोठी मदत होईल असे गौरवउद्गार गायकवाड यांनी काढले. 


पक्षाची ध्येय धोरणे याचा सन्मान करून राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे पक्ष बळकटीचे स्वप्न पूर्ण करा असा सल्लाही गायकवाड यांनी दिला आहे. उघडे विविध स्तरावर कार्यरत असून त्यांच्या मागे समाजबांधवांचा मोठा रेटा आहे त्यामुळे डोंबिवलीतील सर्वसामान्य घटकांची रखडलेली कामे पूर्णत्वास नेण्यास रिपाईला उपयोगी पडणार असल्याची चर्चा उघडे यांच्या निवडीने शहरात सुरु आहे. कार्यकारिणीत सहाय्यक सचिव म्हणून समाधान तायडे यांचीही निवड करण्यात आली आहे.

माणिक त्रिंबक उघडे यांची डोंबिवली शहर कार्याध्यक्ष पदी निवड माणिक त्रिंबक उघडे यांची डोंबिवली शहर कार्याध्यक्ष पदी निवड Reviewed by News1 Marathi on December 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads