कोरोना काळात रक्त साठ्याचे केडीएमसीचे यशस्वी नियोजन
कल्याण , कुणाल म्हात्रे : कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री करीत आहेत. आशा परिस्थितीत गेल्या नऊ महिन्यापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सुरू असलेल्या कोरोना संकटकाळात मनपा क्षेत्रातील रूग्णांना रक्त वेळेत उपलब्ध होण्यासाठी यशस्वी नियोजन करीत मनपा क्षेत्रातील रक्त संकलित करणाऱ्या ५ रक्तपेढ्या च्या माध्यमातून "डे टु डे" समन्वय साधत मनपाक्षेत्रातील रूग्णांना रक्ताची गरज भासल्यास पुरेसा रक्त साठा उपलब्ध करीत रूग्णांना रक्तासाठी ठाणे, मुंबई येथे वणवण करण्याची वेळ येऊ दिली नाही.
कोरोनाचे संकट मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासुन केडीएमसीक्षेत्रात घोंगावु लागल्याने दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रूग्णांची संख्या, आशातच, मनपा क्षेत्रातील डाँयलेसिस, रूग्ण, आजारामुळे अँपरेशनसाठी रूग्णालयात दाखल झालेले रूग्ण तसेच अपघातात जखमी झालेल्या रूग्णांना उपचारा दरम्यान लागणाऱ्या रक्तांची गरज पाहता पुरेसा रक्तसाठा नियमित उपलब्ध ठेवणे अंत्यत गरजेचे होते. लाँकडाऊन मुळे रक्तदाते देखील मिळणे कठीण काम होते. मनपा प्रशासनाने, या संकटकाळात काळाची गरज ओळखत पालिका सचिव संजय जाधव यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली या बाबत अँक्शन प्लान तयार केला.
सचिव संजय जाधव यांनी आरोग्य विभाग मनपा तसेच रक्त संकलित करणाऱ्या रक्तपेढ्याच्या माध्यमातून सेवाभावी संस्था, सामाजिरूक संस्था, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष ,यांनी मनपाच्या माध्यमातून सोशल डिस्टन् नियमांचे पालन करीत वेळोवेळी मनपा क्षेत्रात रक्तदान शिबिरे घेतली. यामाध्यमातून रक्तदात्यानी रक्तदान केलेले रक्त संकल्प ब्लड बँक्, अर्पण ब्लड बँक्, प्लाझ्मा बल्ड बँक्, चिदानंद ब्लड बँक्, ईश्वर सेवा ट्रस्ट यांच्यामार्फत संकलित करीत रक्तचा तुटवडा भासणार नाही याकडे लक्ष दिले.
आतापर्यंत पुरेसा रक्त साठा रूग्णांसाठी उपलब्ध करीत मनपा क्षेत्रातील रक्तची गरज भासणार्या रूग्णांना दिलासा देण्याचे काम मनपाने कोरोना पार्श्वभूमीवर केले असल्याची माहिती पालिका सचिव संजय जाधव यांनी दिली. तसेच कोणत्याही रुग्णाला रक्ताची आवश्यकता लागल्यास पालिकेशी संपर्क करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

Post a Comment