लाखोंच्या घरफोड्या करूनही 'गब्बर' भिकारीच पुन्हा अडकला पोलिसांच्या जाळयात
भिवंडी , प्रतिनिधी : लाखोंच्या घरफोडीच्या अनेक गुन्ह्यात सहभाग असलेल्या 'गब्बर' नावाचा सराईत घरफोड्याने दोन साथीदारांसह भिवंडी तालुक्यातील भूमी इंडस्ट्रियल मधील कृष्णा फॅब्रीक्सच्या गोदामातून ७ लाख ६८ हजार रुपयांचे सोफ्याकरिता लागणारे कापडाचे वेगवेगळ्या कंपनीचे रोल एका टेम्पोत भरून लंपास केले होते. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी गब्बर उर्फ अजय हरिजन (वय, ३५, रा. एरोली, नवीमुंबई ) मोहम्मद इरफान जैनुलआबिदिन शेख (वय, २७,रा, वडाळा मुंबई) संतोष खरात (वय, ३८, रा. एरोली, नवीमुंबई ) असे लाखोंच्या घरफोडी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. या आरोपी त्रिकूटाकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमालासह टेम्पो जप्त करण्यात आला आहे. तर अनेक लाखोंच्या घरफोड्या करूनही 'गब्बर' भिकारीच राहिल्याने तो पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सीसीटीव्ही फुटजेमुळे 'गब्बर' पोलिसांच्या जाळ्यात ...
घरफोडीचे गंभीर स्वरूप पाहता सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढाले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अभिजित पाटील, नितीन सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक जे. आर. शेरखाने , यांच्यासह पोलीस पथकाने तपासला गती देत, चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक टेम्पो त्या दिवशी जाताना दिसला , या टेम्पोच्या नंबरवरून पोलीस घरफोड्या 'गब्बर' व त्याच्या साथीदारांपर्यत पोचवली आणि त्याला बेड्या ठोकल्या.
काही दिवसापूर्वीच जेलमधून सुटला होता 'गब्बर'
घरफोडीच्या गुन्ह्यात अटक झालेला गब्बर काही दिवसापूर्वीच जेल मधून सुटला होता. त्यांनतर त्याने पुन्हा लाखोंची घरफोडी करण्यासाठी दोन साथीदारासह कट रचला होता. त्यानुसार २८ नोव्हेंबर रोजीच्या रात्रीच्या सुमारास कृष्णा फॅब्रीक्सच्या गोदामात साठवलेल्या महागड्या मुद्देमालावर डल्ला मारला होता. विशेष म्हणजे गब्बर हा घरफोडीतील सराईत गुन्हेगार असून तो मूळचा उत्तरप्रदेशच्या बनरासचा रहिवाशी असून त्याच्यावर अनेक घरफोडीचे जबरी गुन्हे दाखल असल्याची माहिती भिवंडी पोलीस परिमंडळचे पोलीस उप आयुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे
लाखोंच्या घरफोड्या करूनही 'गब्बर' भिकारीच पुन्हा अडकला पोलिसांच्या जाळयात
Reviewed by News1 Marathi
on
December 04, 2020
Rating:

Post a Comment