Header AD

अन्यथा भाजपहि शिवसेना विरोधात बॅनर लागतील भाजपचे शिवसेनेला आव्हान
डोंबिवली , शंकर जाधव  :  ईडीनेशिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस बजावली आहे. शिवसेनेने यासंदर्भात भाजपवर टीका करत डोंबिवलीत अनेक ठिकाणी `ईडी हा भाजपचा पोपट आहे`असे बॅनर लावले.त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसते.बुधवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात वपोनी सचिन सांडभोर यांची भेट घेतली.शहरातील वातावरण शांत आहे. मात्र शिवसेना वातावरण बिघडवीत आहे.पोलिसांनी वेळीच याव लक्ष घालावे. जे हे बॅनर उतरविले नाही तर भाजपा शिवसेने विरोधात बॅनर लावतील असे सांगितले.सांडभोर यांनी डोंबिवली शहरात शिवसेनेने लावलेली बॅनर उतरविल्याचे सांगितले.


भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे,डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब,डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्षा मनीषा राणे,जिल्हा उपाध्यक्ष तथा डोंबिवली पूर्व मंडळ माजी अध्यक्ष संजीव बिरवाडकर, डोंबिवली पूर्व मंडळ महिला आघाडी अध्यक्षा पूनम पाटील,सचिव वंदना गोडबोले, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी, डोंबिवली पूर्व मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष मितेश पेणकर, शहर सचिव प्रकाश पवार, जिल्हा सचिव रवी ठाकूर,मोहन अय्यर,वर्षा परमार,रंजिता मोरे,चैतन्य कदम अदिसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात वपोनी सचिन सांडभोर यांची भेट घेतली.यावेळी शशिकांत कांबळे म्हणाले,राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र शहरात अश्या प्रकारचे बॅनर लावले जात असतीलभाजपा शां बसणार नाही. शिवसेनेला बॅनरमधूनच उत्तर देऊ.लवकरात भाजपाविरोधातील बॅनर पोलिसांनी काढले नाहीत तर शिवसेनाविरोधातील बॅनर लावले जातील.

अन्यथा भाजपहि शिवसेना विरोधात बॅनर लागतील भाजपचे शिवसेनेला आव्हान अन्यथा भाजपहि शिवसेना विरोधात बॅनर लागतील भाजपचे शिवसेनेला आव्हान Reviewed by News1 Marathi on December 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads