Header AD

उंबार्ली टेकडीवर नववर्षाचे सेलिब्रेशन साठी पर्यावरणप्रेमींचा पहारा

डोंबिवली  , शंकर जाधव  :  डोंबिवलीजवळील प्रसिद्ध  असलेल्या उंबार्ली गावातील  पक्षी अभयारण्यात नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी येणाऱ्यांवर  पर्यावरणप्रेमींकडून करडी नजर आहे. नियमांचा भंग केल्यास संबंधितांवर कारवाई करू असा  इशारा  पर्यावरणप्रेमींकडून देण्यात आला  आहे.


नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी अनेकांकडून विविध बेत आखले जात असतात. पण यंदाच्या वर्षा कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हॉटेल, पिकनिक स्पॉट अशा सर्वच ठिकाणी बंदी असल्याने नववर्ष सेलीब्रेशनसाठी   उंबार्ली टेकडीवर येण्याची शक्यता आहे.  टेकडीवर दारूच्या पार्टी आणि सिगारेट पिण्या सिगारेट अनुषंगाने येते. सिगारेटमुळे टेकडीला आग लागण्याची शक्यता आहे.हा धोका टाळण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी पुढाकार घेतला आहे. हा पहारा ३१  डिसेंबर आणि नववर्ष असे दोन दिवस असणार आहे. कुणालाही सायंकाळी सहा ते सकाळी सहा या टेकडीवर प्रवेश मिळणार नाही. रिजन्सीच्या बाजूने टेकडीवर जाणाऱ्या रस्त्यावर एक चौकी पण उभारण्यात आली आहे. दरवर्षी लोक या टेकडीवर येत असतात. 


पण यंदाच्या वर्षी बाहेर जाण्याची संधी नसल्याने अनेकजण या टेकडीकडे जातील. या टेकडीवर काहीजण मद्यपान करण्यासाठी येत असतात. त्यांना आळा घालण्यासाठी हा पहिलाच प्रयत्न पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून कुणीही टेकडीकडे येऊ नये असा संदेश दिला आहे. ज्या लोकांर्पयत संदेश पोहोचणार नाही त्यांच्यासाठी हा पहारा असणार आहे. पर्यटकांनी नियमांचे किंवा सूचनांचे उल्लंघन केल्यास भारतीय वन अधिनियम 1927 आणि भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.


हा पहारा देण्यासाठी मंगेश कोयंडे, जितू जयस्वाल, अजय करोडी, देवेश तिवारी, संतोष यादव, सचिन कारीया, गोरखनाथ पाटील, सुशांत पाटील, प्रितेश काटे, ममता परदेशी, अजय पाटील, परेश पाटील, राहूल साटम, समीर पालांडे या स्वयंसेवकांनी वेळेचे नियोजन केले आहे.
उंबार्ली टेकडीवर नववर्षाचे सेलिब्रेशन साठी पर्यावरणप्रेमींचा पहारा  उंबार्ली टेकडीवर नववर्षाचे सेलिब्रेशन साठी पर्यावरणप्रेमींचा  पहारा Reviewed by News1 Marathi on December 31, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads