ठाणे महानगरपालिकेच्या वतीने महापौर, ठाणे जिल्हा पालकमंत्री यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले
१) ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस मा.महापौर नरेश गपणत म्हस्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उप महापौर सौ.पल्लवी पवन कदम, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता फाटक, उप आयुक्त संदीप माळवी तसेच महापालिका कर्मचारी आदी उपस्थित होते.
२) ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने कोर्ट नाका येथील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर नरेश गणपत म्हस्के,उप महापौर सौ.पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता फाटक, माजीवडा मानपाडा प्रभाग समिती अध्यक्ष भूषण भोईर,परिवहन समिती सभापती विलास जोशी, जेष्ठ नगरसेवक देवराम भोईर, नगरसेवक सुधीर कोकाटे, उप आयुक्त संदीप माळवी, माजी नगरसेवक पवन कदम यांच्यासह कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
3) ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ठाणे स्टेशन रोड येथील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर नरेश गणपत म्हस्के,उप महापौर सौ.पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा सौ.नम्रता फाटक, माजीवडा मानपाडा प्रभाग समिती अध्यक्ष भूषण भोईर,परिवहन समिती सभापती विलास जोशी, जेष्ठ नगरसेवक देवराम भोईर, उप आयुक्त संदीप माळवी, माजी नगरसेवक पवन कदम आदी उपस्थित होते.

Post a Comment