Header AD

भिवंडीत महिलेची धारदार शस्त्राने सपासप दहा वार करून निर्घृण हत्या

 
भिवंडी ,  प्रतिनिधी  :  शहरातील तीनबत्ती परिसरात असलेल्या हाफसनआळी परिसरात एका ३८ वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने धारधार शस्त्राने सपासप निघृण हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे . याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

  

लक्ष्मीबाई भुरला ( वय ३८ ) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून सदर महिला ब्युटी पार्लरचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी सकाळी सदर महिला राहत असलेल्या घरात एकटी असतांना एका अज्ञात मारेकरूने महिलेच्या शरीरावर ९ ते १० वार करत गळा चिरून या महिलेची हत्या केली आहे. मयत महिलेचा मुलगा रात्रपाळीचे काम आटपून सकाळी घरी आला असता घरचा दरवाजा लॉक असल्याने त्याने उघडून बघितले असता घरात रक्ताच्या थारोळ्यात आईचा मृतदेह पाहून मुलाला धाकच बसला.


या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस, व फॉरेंसिक लॅबचे पथक दाखल होऊन पंचनामा करून या घटनेचा सखोल तपास सुरु असून हि हत्या नेमकी का करण्यात आली याची माहिती अजूनही मिळाली नाही. विशेष म्हणजे घराचा दरवाजा आतून उघडण्यात आला असल्याने व घरातील वस्तूंची चोरी झाली नसल्याने हि हत्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीने केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून शहर पोलीस सखोल तपास करीत आहेत. 
भिवंडीत महिलेची धारदार शस्त्राने सपासप दहा वार करून निर्घृण हत्या भिवंडीत महिलेची धारदार शस्त्राने सपासप दहा वार करून निर्घृण हत्या Reviewed by News1 Marathi on December 19, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads