Header AD

भिवंडीतील धर्मराजा सेवा संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्काराने राज्यपालांच्या शुभहस्ते सन्मान

 भिवंडी ,प्रतिनिधी  :  कोरोना काळात लागू केलेल्या लॉकडाऊन काळात सर्व उद्योग व्यवसाय बंद असल्याने यंत्रमाग उद्योगनगरीतील यंत्रमाग व्यवसाय ठप्प झाले होते.शहरात रोजीरोटीसाठी आलेल्या परराज्यातील ,स्थलांतरीत मजूर कुटुंबियांवर उपासमारीची पाळी ओढवली होती.या संकट काळात भिवंडी शहरात नगरसेवक निलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली धर्मराजा या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अन्नछत्र सुरू करण्यात आले होते.या अन्न छत्रामधून शहरातील शेकडो कामगार कुटुंबियांसह ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबियांची भूक भगविणाऱ्या धर्मराजा सेवा संस्थेच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय मारवाडी सामाजिक संस्थेने घेऊन धर्मराजा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश चौधरी यांचा राजभवन येथे एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे .लॉकडाऊन सुरू होताच नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले होते.संस्थेचे प्रमुख निलेश चौधरी व त्यांचे सहकारी नितेश ऐनकर, मयूर चौधरी ,महादेव गव्हाणे ,महेश हेडा, गोपाल हेडा,संदीप बजागे, दीपक तिवारी यांच्या सहकार्यातून धर्मराजा सेवा संस्थेने 25 मार्चपासून सुरू केलेल्या मोफत अन्न पाकीट वितरण हे 40 दिवस सुरू ठेवून शहरासोबत तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी वस्ती असलेल्या भागात तब्बल 40 दिवस साडेचार लाख अन्न पाकिटे वितरीत करून नागरीकांची भूक भागविण्याचा प्रयत्न केला .त्या सोबत 30 हजार आर्सेनिक गोळ्यांची पाकिटे वितरण,5000 कुटुंबियांना धान्य वितरण करून उत्तरप्रदेश ,राजस्थान,गुजरात,तेलंगणा राज्यातील भिवंडी शहरात अडकून पडलेल्या नागरीकांची त्यांच्या गावी जाण्यासाठी मोफत बस सुविधा उपलब्ध करून त्यांच्या गावी सुखरूप पोहचविले .या सेवा कार्याची दखल स्थानिक पातळीवर घेतली जात असतानाच आंतरराष्ट्रीय मारवाडी फेडरेशनच्यावतीने कोरोना योद्धा सन्मान पुरस्कार राज्यपालांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी व्यासपीठावर शैलेश लोढा ,सुमन अग्रवाल अभिनेत्री कायरा अरोरा यांसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते .
भिवंडीतील धर्मराजा सेवा संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्काराने राज्यपालांच्या शुभहस्ते सन्मान भिवंडीतील धर्मराजा सेवा संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्काराने राज्यपालांच्या शुभहस्ते सन्मान Reviewed by News1 Marathi on December 02, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads