Header AD

लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच परिवहनच्या उत्पन्नात वाढ


एका दिवसाचे उत्पन्न १४ लाख ७५ हजारावर परिवहन च्या फेऱ्या आणि मार्गि कांमध्ये केली वाढ...


ठाणे , प्रतिनिधी  :  डबघाईला आलेल्या परिवहनला लॉकडाऊनच्या काळात मोठा आर्थिक फटका बसला. मात्र या कोरोनाच्या काळानंतर आता परिवहन हळूहळू प्रगती पथावर येत आहे. परिवहन समिती सदस्य आणि परिवहन सभापती विलास जोशी यांच्या परिवहनच्या आगारांना  देण्यात येणाऱ्या वारंवारच्या भेटीने परिवहन कर्मचारी यांचे मनोधैर्य वाढले आहे. लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच सोमवारी परिवहनच्या उत्पन्न १४ लाख ७५ हजार एवढे झाल्याची माहिती परिवहन सभापती विलास जोशी यांनी सांगितले. 


२० लाख ठाणेकरांना सुलभ आणि सुरक्षित प्रवासासाठी जवळपास ५०० बसेसची गरज असतानाही अपुऱ्या बसेसच्या दिमतीवर अवघ्या २१७ च्या आसपास बसेस सोमवारी रस्त्यावर धावल्या आणि परिवहनच्या एका दिवसाचे उत्पन्न पहिल्यांदाच १४ लाख ७५ हजारावर गेले. या उत्पन्नात वागले डेपोमधून रस्तयावर धावलेल्या परिवहनच्या बसेसने सोमवारी २ लाख ३८ हजार ८७० रुपयांचे उत्पन्न मिळवले. कळवा डेपोमधून रस्त्यावर धावलेल्या बसेस मधून १ लाख ५१ हजार ९७४ रुपये, मुलाबाग डेपोच्या माध्यमातून ९४ हजेरी ५४४ रुपये, आनंदनगर बसडेपो मधून ९ लाख ८७ हजार ९८१ एवढे उत्पन्न सोमवारी झाले तर पासच्या माध्यमातून ७८ रुपये आणि दंडात्मक कारवाईचे २ हजार १५ रुपयेच असे मिळून सोमवारी पालिकेच्या परिवहनला मिळालेला उत्पन्नाचा एकदा हा १४ लाख ७५ हजार ४६२ एवढा झाला आहे. या उत्पन्नात तेजस्विनी बसेसचा वाटा अपेक्षितच आहे. परिवहनच्या तफयात ५० तेजस्विनी बसेस आहेत. मात्र महिला वाहकांच्या अभावाने रस्त्यावर कमी बसेस धावल्या. अन्यथा आणखीन उत्पनात भर पडली असती अशी प्रतिक्रिया परिवहन सभापती विलास जोशी यांनी व्यक्त केली. 


ठाणे परिवहनने सुरु केले ६ नवे रूट ..


ठाणे परिवहन समिती आणि सभापती यांनी परिवहन व्यवस्थापकांशी चर्चा करून नव्या सहा रूटवर परिवहन सेवा सुरु केली. यात नालासोपारा येथे एकट्या ठाणे परिवहन सेवेची बस सुरु आहे. तसेच माजिवडा-ते कल्याण फाटा, रिंगरूट प्रमाणे ठाणे स्टेशन सॅटिस ते मुलुंड चेकनाका ते सॅटिस (यात सॅटिस कडे  बदल करण्यात आला) ज्याठिकाणी परिवहनच्या बसेसची संख्या कमी आहे त्या ठिकाणी आता परिवहन सेवा सुरु करणार किंवा बसेसच्या फेऱ्या वाढविणार असलायची माहिती आहे. 


परिवहनच्या तेच कर्मचारी आहेत. त्यांच्या डेपोला वारंवार देण्यात आलेल्या भेटी, आवश्यक सामान उपलब्ध करून देणे, विविध डेपोमध्ये परिवहन टीमने पाहणी करणे यामुळे परिवहन कर्मचारी यांच्यात उत्साह निर्माण झाला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदशनाखाली महापौर नरेश म्हस्के आणि स्थायी सभापती संजय भोईर यांच्या सहकार्याने परिवहन आता हळूहळू भरारीकडे वाटचाल करीत भविष्यात स्वबळावर परिवहन सेवा चालेल अशा उपायोजना आणि तरतुदी करण्यात येणार आहेत. 


                                                                          

लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच परिवहनच्या उत्पन्नात वाढ लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच परिवहनच्या उत्पन्नात वाढ Reviewed by News1 Marathi on December 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads